मुंबई :केंद्रीय विद्यालय संघटना ही केंद्रीय शाळांसाठी काम करणारी शासकीय संघटना आहे. केंद्रीय विद्यालय संघटनेत विविध प्रकारच्या पदांसाठी परीक्षा घेण्यात येत आहे. यावर्षीचे केंद्रीय विद्यालय संघटनेच्या परीक्षेसाठीच्या प्रवेश पत्राबाबत नवीन सूचना जारी करण्यात आलेली आहे. यामध्ये 28 फेब्रुवारी रोजी जे उपस्थित होते. मात्र ज्यांची परीक्षा रद्द झाली, त्या उमेदवारांना 11 मार्च 2023 रोजी ती परीक्षा देता येईल.
'या' कारणामुळे भर्ती एजन्सीने रद्द : मुझफ्फरपूर डिजिटल सेंटर, बरिया रोड, दादर, अहियापूर, मुझफ्फरपूर बिहार ही केंद्रे आहेत, ज्या ठिकाणी ही परिक्षा होणार होती. 28 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आलेली प्राथमिक शिक्षकांची संगणक आधारित परीक्षा प्रशासकीय कारणास्तव भर्ती एजन्सीने रद्द केली. ही परीक्षा रद्द करण्यासंदर्भातले नियोजन आधी कळवलेले नव्हते. ऐन वेळेला ही प्रशासकीय कारणासाठी परीक्षा रद्द केल्यामुळे आता त्या संदर्भातील परीक्षा 11 मार्च 2023 रोजी घेण्यात येईल.
नियोजनाप्रमाणे परीक्षा घेतली जाईल :यासंदर्भात केंद्रीय विद्यालय संघटनेने 9 मार्च रोजी विशेष सूचना जारी केली आहे. केंद्रीय विद्यालय संघटनेच्या ज्यांची परीक्षा 28 फेब्रुवारी रोजी झाली नाही, त्यांच्यासाठी ते जारी केलेले आहे. त्यात त्यांनी म्हटलेले आहे की, यासंदर्भात प्रवेश पत्र केंद्रीय विद्यालय संघटनेच्या संकेतस्थळावर जाऊन डाउनलोड करता येऊ शकते. म्हणजे 11 मार्च रोजी पुन्हा परीक्षेला बसण्यास संदर्भात कोणताही अडथळा येणार नाही.
प्रवेश पत्र तात्काळ संकेतस्थळावरून डाऊनलोड करावे : यासंदर्भात केंद्रीय विद्यालय संघटना यांच्या संकेतस्थळावरून सर्व पात्र उमेदवारांना ही सूचना देण्यात येत आहे, की 28 फेब्रुवारी रोजी जे लोक हजर होते आणि ज्यांची परीक्षा अचानक रद्द झाली. त्यांनी या संदर्भातील प्रवेश पत्र तात्काळ संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावे, म्हणजे 11 मार्च रोजी च्या परीक्षेसाठी आपली नियोजनाप्रमाणे परीक्षा घेतली जाईल.
हेही वाचा : Maha Budget 2023 : शिंदे-फडणवीस सरकारकडून 'या' घोषणांचा पाऊस; शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्यासाठी आहेत खास योजना