मुंबई : मुंबईत केईएम रुग्णालयात मानसशास्त्रीय विभागात हितगुज 022-24131212 हेल्पलाइन चालवली जाते. तसेच या विभागात येणाऱ्या रुग्णांना समुपदेशन केले जाते. वांद्रे येथे भाभा रुग्णालयात दिलासा सेंटर येथून रुग्णांना मदत केली जाते. तसेच वास्तव फाउंडेशन तर्फे समुपदेशन उपलब्ध करुन दिल्या जाते.
पुरुषांच्या आत्महत्या दुप्पट :पुरुषांचे आरोग्य महिलांपेक्षा कमी असते. वयोमानानुसार गंभीर असे आजार होतात. सक्तीने शाळा सोडण्याचे प्रमाणही पुरुषांमध्ये जास्त आहे. घरगुती हिंसाचारात खोट्या केसेस होतात. पुरुषाची चुकीची प्रतिमा समाजात निर्माण केली जाते. अनेक कारणाने आत्महत्या केलेल्या पुरुषांची संख्या महिलांपेक्षा दुप्पट आहे.
आत्महत्येची कारणे :कौटुंबिक अत्याचार, लैंगिक शोषण, सामाजिक अत्याचार, विवाह किंवा प्रेम प्रकरणात फसवणूक, संशय घेणे, अंधश्रद्धा, नोकरी धंद्यातील नैराश्य, वेड लागणे अशी अनेक कारणे आत्महत्या करण्यामागे असतात. तर खोट्या गुन्हा अडकवणे, विनयभंग, लैंगिक छळ, बलात्कार, स्टॉकिंग, वैवाहिक संबंधात पोलीस तक्रार अशा तक्रारींमध्ये पुरुषांनी आयुष्य उध्वस्त होत असल्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. एकतर्फी प्रेम किंवा प्रेमातील वियोगामुळे तरुणांना जास्त आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.