महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लिलावप्रकरणी कातरणी ग्रामपंचायत निवडणूक रद्द - katrani-gram-panchayat-election latest news

15 जानेवारीला कातरणी ग्रामपंचायसाठी 11 सदस्य पदासाठी मतदान प्रक्रिया होणार होती. यासाठी आयोगाने नियोजित कार्यक्रम ही आखला होता. मात्र, त्या आधीच सर्व सदस्य बिनविरोध निवडून देण्यासाठी गावात सदस्यपदासाठी लिलाव करण्यात आला होता.

लिलावप्रकरणी कातरणी ग्रामपंचायत निवडणूक रद्द
लिलावप्रकरणी कातरणी ग्रामपंलिलावप्रकरणी कातरणी ग्रामपंचायत निवडणूक रद्दचायत निवडणूक रद्द

By

Published : Jan 29, 2021, 6:49 AM IST

मुंबई-नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील कातरणी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत जाहीर लिलाव झाल्याचे पुरावे समोर आल्याने ही ग्रामपंचायतीसाठी राबविण्यात आलेली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.

काय आहे लिलाव प्रकरण?

१५ जानेवारीला कातरणी ग्रामपंचायसाठी ११ सदस्य पदासाठी मतदान प्रक्रिया होणार होती. यासाठी आयोगाने नियोजित कार्यक्रम ही आखला होता. मात्र, त्या आधीच सर्व सदस्य बिनविरोध निवडून देण्यासाठी गावात सदस्यपदासाठी लिलाव करण्यात आला होता. त्यासंबंधी काही ध्वनिचित्रफितही आढळून आली होती. त्यानंतर प्राप्त तक्रारीवरुन निवडणूक आयोगाने ही निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त मदान यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details