मुंबई:कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीमध्ये बारसू येथील कातळ शिल्पांचाही समावेश होत असून याला आपण तीव्र विरोध करीत असल्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. वास्तविक या प्रकल्पामध्ये कातळ शिल्पांची जमीन सुद्धा समाविष्ट आहे याची माहिती आज आपल्याला मिळाली आहे. जागतिक वारसा असलेली ही कातळ शिल्पे नेस्तनाबूत होऊ नयेत अशी आपली अपेक्षा असून यासाठी प्रकल्पामध्ये ही जमीन संपादित केली जाऊ नये स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्प राबवला जाऊ नये असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत त्यांनी स्थानिकांशी चर्चा करून प्रकल्पासंदर्भात आणि जमिनी संदर्भात स्थानिकांच्या भावना जाणून घेतल्या.
बारसूमध्ये आढळली कातळ शिल्पे:कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे कातळ शिल्पे आढळली आहेत. ही कातळ शिल्पे अश्मयुगीन असून 2022 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये या कातळ शिल्पांचा उल्लेख केला असून तशी नोंद केल्याची माहिती पुरातत्व तज्ञ यांनी दिली आहे. ही कातळ शिल्पे दगडामध्ये कोरली गेली असून त्यामध्ये विविध आकार आणि तत्कालीन संस्कृतीच्या खुणा आढळत असतात. त्यामुळे जागतिक वारसा असलेली ही कातळ शिल्पे आहेत जागतिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे स्थान यांना असल्याचे तज्ञांनी सांगितले.
काय आहेत कातळ शिल्पे?:कोकणामध्ये जांभा दगडा त ने तयार झालेली अनेक छोटी पठारे आहेत या पठारांना कोकणात सडा असे म्हटले जाते या सड्यांवर अश्मयुगात कातळ शिल्पे कोरली गेली आहेत. गुड आणि अजमेर अशा खोद चित्र रचना या ठिकाणी केलेल्या आढळतात स्थानिक भाषेत याला लोक कातळ खोदशिल्प असे म्हणतात या कातळशिल्पांच्या मुळे मानवाच्या उत्क्रांतीवर त्यांच्या विविध कालखंडातील वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रकाश टाकला जातो. या कातळ शिल्पांच्या माध्यमातून तत्कालीन मानवी संस्कृती समोर येते. या खोदचित्र रचनांमध्ये लहान आकाराच्या खळग्यापासून ते अगदी त्रिकोण चौकोन यांच्या सहाय्याने पक्षांच्या चित्ररचना काढलेल्या आढळतात त्याचप्रमाणे एक शिंगी गेंडा हत्ती वाघ पाणघोडा यांची सुद्धा चित्रे आढळतात.