महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत मोठी कारवाई; 22 लाखांच्या रोकडसह 1 कोटींचं काश्मिरी चरस जप्त - 22 लाखांच्या रोकडसह एक कोटींचं काश्मिरी चरस

Kashmiri Charas Seized : अमली पदार्थ विरोधी पथकानं मुंबईत मोठी कारवाई केलीय. या पथकानं आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत त्यांच्याकडून 22 लाखांच्या रोकडसह एक कोटींचं काश्मिरी चरस जप्त केलंय.

Kashmiri Charas Seized
Kashmiri Charas Seized

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 22, 2023, 10:40 PM IST

मुंबई Kashmiri Charas Seized : अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटनं आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केलाय. यात सुमारे 1.04 कोटी किमतीचं 2.600 किलो काश्मिरी चरस जप्त केलंय. तसंच इतर कारवाईत 22 लाख रुपये रोख आणि एक दुचाकीसह 120 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) जप्त केलंय. असा एकूण 1.51 कोटी ड्रग्ज हस्तगत करून विशेष ऑपरेशनमध्ये एका काश्मिरी व्यक्तीसह सहा ‘ड्रग पेडलर’ पकडल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांनी दिलीय.

काय काय केलं जप्त : भायखळा पूर्वेतून या कारवाईत 2 किलो 600 ग्राम 'काश्मिरी चरस' जप्त करण्यात आलंय. याची किंमत 1.04 कोटी इतकी आहे. तसंच 120 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) सह 22 लाखाची रोकड माहीम, डोंगरी, घोडपदेव, दोन टाकी, नागपाडा परिसरातून हस्तगत करण्यात आलीय. या एमडी ड्रग्जची किंमत 25 लाख आहे. या प्रकरणी अंमली पदार्थ विकणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली असून यात एका काश्मिरी व्यक्तीला देखील अटक करण्यात आलीय. अंमली पदार्थ तस्करांनी जम्मू काश्मीरमधून काश्मिरी चरस आणलं होतं. जम्मू काश्मिरमधील अनंतनाग इथं राहणाऱ्या काश्मिरी आरोपीचं नाव हाजी अब्दुल रेहमान आहे. हाजी अब्दुल रेहमानसह सरताज अहमद मुमताज मन्सुरी आणि कैलास दीपक कनोजिया या दोघांना देखील बेड्या ठोकण्यात आल्या असून ही दोघं पूर्वी उत्तर प्रदेशात राहत होते. कनोजिया याचं मुंबईत टेलरिंगचं दुकान असून अक्रोड विक्रीच्या नावाखाली ही आंतरराज्यीय टोळी अमली पदार्थ विकत होते.


एक कोटींच चरस जप्त : अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटला 21 डिसेंबरला विशेष ऑपरेशनमध्ये भायखळा पूर्व भागात गस्त घालताना 1.800 किलो काश्मिरी चरससह दोन संशयित व्यक्ती आढळून आल्या. त्यांची चौकशी करताना त्यांचा आणखी एक साथीदार भायखळा पूर्व भागात असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी सखोल तपास केल्यानंतर भायखळा पूर्व परिसरातून तिसऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असता त्याच्याकडून 800 ग्रॅम काश्मिरी चरस जप्त करण्यात आलाय. या तिन्ही आरोपींकडून एकूण 2.600 किलो काश्मिरी चरस जप्त करण्यात आलंय. याची किंमत 1.04 कोटी रुपये आहे. अमली पदार्थ तस्करांनी जम्मू काश्मीरमधून काश्मिरी चरस आणलं. हाजी अब्दुल रहमान हा जम्मू काश्मीरमधून अक्रोड आणतो आणि काश्मिरी चरस अक्रोडाच्या पिशवीत लपवून मुंबईत विकतो अशी यांची गुन्ह्याची पद्धत आहे.

22 लाखांची रोकड जप्त :यासोबत अमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटला 21 डिसेंबरला माहीम परिसरात विशेष ऑपरेशनमध्ये एक संशयित व्यक्ती आढळून आली. त्याच्या अंगझडतीत एमडी ड्रग्ज आढळून आले होते. या आरोपीकडे चौकशी केली असता त्यानं मुंबई परिसरातून एमडी घेतल्याचं सांगितलं. त्यानंतर दोन आरोपींना शोधून काढून एकाच्या घरातून 22 लाखांची रोकड जप्त केलीय. या तिन्ही आरोपींकडून एकूण 120 ग्रॅम एमडीसह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

हेही वाचा :

  1. ANC Seized Drugs : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पाच कोटींचं ड्रग्ज जप्त; अँटी नार्कोटिक्स सेलनं नायजेरियन तस्कराला केलं अटक
  2. Charas Smuggling : अडीज कोटींच्या चरससह मुंबईतून ड्रग्ज पेडलरला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details