मुंबई: आदिपुरुष चित्रपटावर जोपर्यंत बंदी घातली जात नाही, तोपर्यंत करणी सेनेचा विरोध कायम राहणार आहे. चित्रपटात रामायणाचा अपमान करण्यात आल्याचा आरोप करणी सेनेने केला आहे. करणी सेनेतर्फे आदिपुरुषाचा निषेध करण्यात आला. मुंबईतील कांदिवली पश्चिम महावीर नगर येथे करणी सेनेने चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत, लेखक मनोज मुंतशीर यांच्या फोटोला चपला तसेच लाथा मारून, काळे फासण्यात आले. त्याचबरोबर फोटो देखील जाळण्यात आले. करणी सेनेचे म्हणणे आहे की, जिथे ते दिग्दर्शक आणि लेखक भेटतील तिथे त्यांना बेदम मारहाण केली जाईल आणि चपलांचा हार घालण्यात येईल.
चित्रपटाने 100 कोटींचा आकडा पार केला: आदिपुरुष हा चित्रपट पडद्यावर दाखला होताच तेव्हा तो राष्ट्रीय विषय बनला. कुठे विरोध तर कुठे वाद सुरु झाला आहे. आता सर्व सामाजिक आणि धार्मिक संघटना याला विरोध करत आहेत. रामायणावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आहेत. प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांच्या या चित्रपटाने नवा रेकॉर्ड बनवला आहे. पण चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि कलाकारांनाही विरोधाला सामोरे जावे लागते. मात्र, विरोधानंतरही या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने 100 कोटींचा आकडा पार करत, पठाणला मागे सोडले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.