मुंबई- कर्नाटकमध्ये विधानसभेत काल (मंगळवार) झालेल्या बहुमत चाचणीत जेडीएस आणि काँग्रेसचे सरकार कोसळले. ज्या बंडखोर आमदारांमुळे काँग्रेस आणि जेडीएस हे दिवस बघायला लागले. ते आमदार मात्र अजूनही मुंबई सोडण्यास तयार नाहीत.
कर'नाटकी' आमदारांचा मुंबईत आणखी चार दिवस मुक्काम
कर्नाटकमध्ये विधानसभेत काल (मंगळवार) झालेल्या बहुमत चाचणीत जेडीएस आणि काँग्रेसचे सरकार कोसळले. ज्या बंडखोर आमदारांमुळे काँग्रेस आणि जेडीएस हे दिवस बघायला लागले. ते आमदार मात्र अजूनही मुंबई सोडण्यास तयार नाहीत.
काल मंगळवारी घडलेल्या वेगवान घडामोडीनंतर या आमदारांनी मुंबईत वास्तव्यास असलेल्या रेनिसन्स हॉटेलमध्ये पुढे काय पाऊल उचलायचे? याबाबत बैठका घेण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे. त्यांची रणनीती काय असेल याबाबत राजकीय क्षेत्रात उत्सुकता आहे. एकूण १२ आमदार मुंबईत आहेत. अजूनही ४ दिवस मुंबईतून कुठे जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
कालचा (मंगळवार) दिवस जेडीएस आणि काँग्रेस सरकारसाठी अखेरचा दिवस ठरला. १६ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसची संख्या ९९ तर भारतीय जनता पक्षाची संख्या १०५ अशी होती. काँग्रेसने बंडखोर आमदारांची दिलजमाई करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला, परंतु त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले. काँग्रेस आणि जेडीएस सरकार कोसळल्यानंतर आता आपलं भविष्य काय पुढे काय करायचे ? आपले निलंबन होणार का ? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी बंडखोर आमदार हॉटोलमध्ये बैठका घेत आहेत.