महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'जीवाची मुंबई' केल्यानंतर कर्नाटकचे बंडखोर आमदार आता साई दर्शनाला - sai baba

कर्नाटकचा राजकीय पेच अजूनही सुटलेला नाही. राजीनामा दिलेले आमदार निवांत वेळ घालवत आहेत. शनी शिंगणापूर व साईबाबांचे दर्शन झाल्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार आहेत ते स्पष्ट करणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.

कर्नाटकचे आमदार

By

Published : Jul 13, 2019, 12:11 PM IST

मुंबई- मागील आठवड्यापासून मुंबईत असलेल्या कर्नाटकच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे मंगळवारी आपला राजीनामा दिल्यानंतर मोकळा श्वास घेतला आहे. शहरातील चटपटीत जेवणासह, खरेदीचा आनंद लुटल्यानंतर आता ते साई दर्शनासाठी शिर्डीला निघाले आहेत. शुक्रवारी त्यांनी सिद्धीविनायकचे दर्शन घेतले होते. आता साई चरणी आमदार माथा टेकवणार आहेत.

कर्नाटकचे बंडखोर आमदार साई दर्शसाठी शिर्डीकडे रवाना

सिद्धीविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर आमदारांनी 'दक्षिण कल्चर करी' आणि 'दिवा महाराष्ट्राचा' या हॉटेलमध्ये जेवणावर ताव मारला. याबरोबरच त्यांनी मुंबईतील काही प्रसिद्ध ठिकाणे पाहिली.

कर्नाटकचा राजकीय पेच अजूनही सुटलेला नाही. राजीनामा दिलेले आमदार निवांत वेळ घालवत आहेत. शनी शिंगणापूर व साईबाबांचे दर्शन झाल्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार आहेत ते स्पष्ट करणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.

कर्नाटकचे आमदार राजीनामा दिल्यापासून मुंबईतच होते. मुंबईतील रेनिसन्स हॉटेलमध्ये ते वास्तव्यास होते. नाट्यमय घडामोडींनतर सर्वाेच्च न्यायालयाने आमदारांच्या राजीनाम्याला मंगळवारपर्यंत स्थगिती दिली आहे. विधानसभा अध्यक्षांना राजीनामे न स्वीकारण्याबद्दल निर्देश दिले आहेत. मात्र, सर्व काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार राजीनाम्यावर ठाम आहेत. राजीनामा स्वीकारल्यानंतर आमदारांची पुढली दिशा काय असेल, हे त्यांनी अद्याप स्पष्ट केले नाही.

बंडखोर आमदार कोणत्या पक्षाला पाठींबा देणार त्याबाबत आता देव दर्शनानंतर समजणार असल्याचेही बोलले जाते. त्यावरून दर्शन होईपर्यंत कर्नाटक नाट्याला कसा विराम मिळेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details