मुंबई - कर्नाटक महाराष्ट्र सिमा वादावर ( Karnataka Maharashtra border dispute ) कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले आहे. भारत हा राज्यांचा संघ आहे. प्रत्येक राज्याचे स्वतःचे हक्क आहेत. कायदा अतिशय स्पष्ट आहे. कायदा सुव्यवस्था राखणे हे संबंधित सरकारचे कर्तव्य आहे असे, महाराष्ट्र कर्नाटक सिमा वादावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ( Chief Minister Basavaraj Bommai ) यांनी म्हटले आहे.
CM Basavaraj Bommai : मुख्यमंत्री बोम्मईंची महाराष्ट्रावर वक्रदृष्टी; 'आम्ही आमच्या अधिकाराबाबत बोलत आहोत' - Karnataka Maharashtra border row
कर्नाटक महाराष्ट्र सिमा वादावर ( Karnataka Maharashtra border dispute ) कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले आहे. कायदा अतिशय स्पष्ट आहे. कायदा सुव्यवस्था राखणे हे संबंधित सरकारचे कर्तव्य आहे असे, महाराष्ट्र कर्नाटक सिमा वादावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ( Chief Minister Basavaraj Bommai ) यांनी म्हटले आहे.
कायदेशीर लढाई लढत राहू -महाराष्ट्राने 2004 मध्ये गुन्हा दाखल केला त्यावर आम्ही कायदेशीर लढाई लढत आहोत. कायदेशीर लढाई लढत राहू असे ते म्हणाले. आम्हाला आत्मविश्वास आहे, आम्ही आमच्या सीमा, आमचे लोकाचे रक्षण करू करण्यास समर्थ असल्याचे ते म्हणाले.
आम्ही कायद्याचे पालन करणारे लोक -दोन राज्यात जर कोणी असे द्वेश पसरवत असेल तर मी त्याचा निषेध करतो. महाराष्ट्र सरकारने त्वरित कारवाई करून त्यांना थांबवावे अशी विनंती देखील त्यांनी केली. अशा वादामुळे राज्यांमध्ये मोठी फूट निर्माण होईल. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने तातडीने कारवाई करावी. आम्ही कायद्याचे पालन करणारे लोक आहोत. आम्ही आमच्या अधिकाराबाबत बोलत असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले.