महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Karnataka Election Result 2023: महाराष्ट्र एकीकरण समितीला धक्का; कर्नाटकातल्या मराठी भाषिकांचा काँग्रेसला कौल - 18 पैकी 11 जागांवर काँग्रेस विजयी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये बेळगाव आणि सीमा भागातील अठरा जागांपैकी अकरा जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झालाचे दिसते. यामुळे या भागातील मराठी भाषिकांनी काँग्रेसच्या पारड्यात आपली मते टाकल्याचे स्पष्ट होत असून, धर्मनिरपेक्ष पक्षाकडे हा कल असल्याचे राजकीय तज्ञ सांगतात.

Karnataka Election Result 2023
कर्नाटक विधानसभा निवडणुक निकाल

By

Published : May 13, 2023, 3:37 PM IST

कर्नाटक विधानसभा निवडणुक निकालाची माहिती देताना राजकीय विश्लेषक

मुंबई: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसते. विशेष म्हणजे मराठी माणसांचा बालेकिल्ला ओळखला जाणाऱ्या कर्नाटकची उपराजधानी असलेल्या बेळगाव आणि अन्य ग्रामीण भागांमध्ये काँग्रेस पक्षाने बाजी मारल्याचे दिसते. बेळगाव मध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर सीमा बासियांचा आत्मा असलेल्या भागांमध्ये 18 पैकी 11 जागांवर काँग्रेस विजयी होताना दिसते आहे.


धर्मनिरपेक्ष पक्षाकडे कल: भारतीय जनता पक्षाने कर्नाटकात येऊन हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मागायला सुरुवात केली होती. मात्र मराठी भाषिक मोठ्या प्रमाणावर असलेल्या पूर्वीच्या मुंबई प्रांत या भागामध्ये, 18 विधानसभा मतदारसंघ येतात. या विधानसभा मतदारसंघांमध्ये 11 जागा पुन्हा एकदा काँग्रेसच्या पारड्यात जाताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे कुणीतरी येऊन आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत, हिंदुत्व हे आम्हाला आधीपासूनच ठाऊक आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला या भागात अधिक पसंती मिळाल्याचे, राजकीय विश्लेषक रवी पाटील सांगतात.



कोण उमेदवार आघाडीवर:बेळगाव ग्रामीण मधून काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर या विजयी होताना दिसत आहेत. बेळगाव दक्षिण मधून फक्त भाजपच्या अभय पाटील यांना आपली जागा राखता आली आहे. मात्र बेळगाव उत्तर मध्ये काँग्रेस विजयाच्या जवळ आहे. खानापूर मध्ये विठ्ठल हलगेकर आघाडीवर आहेत. यमकनमर्डी मतदारसंघातून सतीश जारकीहोळी आघाडीवर आहेत. एकूणच चित्र पाहिले तर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसते. त्यामुळे पुन्हा एकदा कर्नाटकात मराठी भाषिकांनी काँग्रेस पक्षावर विश्वास टाकला असल्याचे समोर येत आहे.



महाराष्ट्र एकीकरण समितीला पुन्हा धक्का: मराठी भाषिकांच्या लढ्यासाठी सातत्याने झुंज देणारी महाराष्ट्र एकीकरण समिती अजूनही संघर्ष करताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र एकीकरण समितीचा सीमा भागातील राजकीय प्रभाव कमी होताना दिसतो आहे. एकेकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे दोन किमान आमदार विजयी होताना दिसत होते. मात्र आता हे चित्र पूर्णतः बदलले असून नव्या पिढीने महाराष्ट्र एकीकरण समितीकडे संघटना म्हणून तर, अन्य राजकीय पक्षांकडे पक्ष म्हणून पाहिल्याने ही परिस्थिती निर्माण होत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला मराठीच्या मुद्द्यावर जनाधार असला तरी प्रत्यक्षात राजकीय गणितांमध्ये इथला मतदार राजकीय पक्षांच्या झेंड्याखाली एकवटताना दिसू लागला. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीची काही अंशी पीछेहाट झाल्याचे रवी पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा -

  1. MES Karnataka Election Result 2023 कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 निकालात सीमावर्ती भागात एमईएस उधळणार गुलाल
  2. Karnataka Election Result 2023 कर्नाटक काँग्रेस नेत्यांमध्ये लागली मुख्यमंत्री पदाची शर्यत कोणाच्या गळ्यात पडणार माळ
  3. Karnataka Election Result 2023 नागरिकांना बदल हवा आहे म्हणत काँग्रेस कार्यालयात जल्लोष सुरू भाजप जेडीएस नेते हवालदिल

ABOUT THE AUTHOR

...view details