मुंबई -कर्नाटक काँग्रेसचे आमदार श्रीमंत पाटील हे आश्चर्यकरित्या बुधवारी बंगळुरू येथील एका रिसॉर्टमधून गायब झाले होते. कालपासून त्यांचा शोध सुरू होता. मात्र, आता त्यांच्याबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. पाटील यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना सध्या मुंबईतल्या सेंट जॉर्ज रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे.
कर'नाटक': काँग्रेसचे बेपत्ता आमदार पाटील सापडले; मुंबईतल्या सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
कर्नाटक काँग्रेसचे आमदार श्रीमंत पाटील हे आश्चर्यकरित्या काल (बुधुवार) बंगळुरू येथील एका रिसॉर्टमधून गायब झाले होते. कालापासून त्यांचा पत्ता लागला नव्हता. मात्र, आता त्यांच्याबद्दल नवीन माहिती समोर आली असून, पाटील यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना मुंबईतल्या सेंट जॉर्ज रुग्णालयात भर्ती केले आहे.
श्रीमंत पाटील यांचे नाव हे बंडखोर आमदारांच्या यादीत नव्हते. काँग्रेसने आपल्या बाजूने असलेल्या सर्व आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवले होते. मात्र, श्रीमंत पाटील यांनी येथून पळ काढत मुंबई गाठली आहे.
छातीत दुखत असल्याने पाटील यांना दादर येथील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना माझी तब्येत ठीक नाही, मी आज होणाऱ्या बहुमत चाचणीत उपस्थित राहू शकत नाही असे पत्राद्वारे कळवल्याची माहिती मिळत आहे.