मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून वारणा, कोयना जलाशयातून कृष्णा नदीत 2.00 टीएमसी आणि उजनी जलाशयातून भीमा नदीत 3.00 टीएमसी पाणी सोडण्याची विनंती केली आहे. कर्नाटकात पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सोडण्याचे निर्देश द्यावेत असेही त्यांनी पत्रात नमुद केले आहे.
तातडीने पाणी सोडण्याची मागणी : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून उत्तर कर्नाटकातील मानव आणि पशुधन या दोघांच्या पिण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कृष्णा नदी आणि भीमा नदीतून पाणी सोडण्याची विनंती केली आहे. वारणा, कोयना जलाशयातून कृष्णा नदीत 2.00 टीएमसी, उजनी जलाशयातून 3.00 टीएमसी पाणी भीमा नदीत तातडीने सोडण्याची मागणी त्यांनी केली. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने सुचना द्याव्यात असे देखीलम मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. हीच विनंती भाजपच्या बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारने उन्हाळ्यात केली होती.
कर्नाटकात पिण्याचाया पाण्याची तीव्र समस्या : वारणा/कोयना जलाशयातून कृष्णा नदीत 3.00 टीएमसी तसेच उजनी जलाशयातून भीमा नदीत 3.00 टीएमसी पाणी मानव तसेच पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्र सरकारकडे पाणी समस्या सोडण्याची विनंती केली आहे. मे २०२३ च्या पहिल्या पंधरवड्यात कृष्णा नदीत पाणी सोडण्यात आले आहे.