मुंबई:कर्जत यार्ड बदलासंदर्भात कर्जत स्थानकावर बूम पोर्टलच्या उभारणीसाठी मध्य रेल्वे मुंबई विभाग विशेष ट्रॅफिक केला. मात्र त्याचा फटका कर्जत अंबरनाथ पासून सीएसएमटीकडे येणाऱ्या सर्व प्रवाशांना बसला. तब्बल 40 मिनिटे उशिराने लोकल धावत आहे. मध्य रेल्वेने तांत्रिक काम सुधारणा संदर्भात सकाळी १०.४५ ते दुपारी १२.१५ (९० मिनिटे भिवपुरी रोड ते पळसधरी पर्यंत सर्व मार्गांवर काही काळ रेल्वे ब्लॉक) केला होता.
कर्जत ऐवजी नेरळ येथून चालविण्यात आल्या:परंतु त्याचा फटका अप आणि डाऊन मार्गावर जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना बसला. या तांत्रिक कामामुळे काही निवडक लोकलमध्ये रेल्वेने रद्द देखील केल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून लोकल कर्जत ऐवजी नेरळ येथून चालविण्यात आल्या त्यामुळे उशीर झाला. कर्जत येथून सकाळी १०.४० आणि दुपारी १२.०० वाजता सुटणारी खोपोली लोकल रद्द केली गेली आहे.
लोकलला येण्यासाठी मार्ग मोकळा: यासंदर्भात मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए के सिंग यांनी सांगितले की, मध्य रेल्वेने कर्जत येथील तांत्रिक कामासाठी काही काळ ब्लॉक घेतला होता. मात्र लागलीच काम झाल्यावर लोकलला येण्यासाठी मार्ग मोकळा केला. परंतु काही ठिकाणी लोकल रद्द करावे लागले. त्यामुळे देखील त्याचा परिणाम झाला. खालील एक्सप्रेस गाड्या लोणावळा, पळसधरी येथे नियमित केल्या जातील आणि गंतव्यस्थानी वेळापत्रकापेक्षा उशिराने पोहोचतील.
नियोजित वेळेपेक्षा उशिराने पोहोचेल: ट्रेन क्रमांक 22731 हैदराबाद- मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 16587 यशवंतपूर- बिकानेर एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 11014 कोईम्बतूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 11014 कोईम्बतूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस नियोजित वेळेपेक्षा उशिराने पोहोचेल. या पायाभूत सुविधांच्या कामांमुळे होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगिरी व्यक्त केली आहे.