महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

International Womens Day : कराटे, किक बॉक्सिंगमधला लखलखता तारा; वाचा भार्गवीच्या यशाचे रहस्य - Karate champion Bhargavi Prashant Sankhe

मुंबईतील १८ वर्षीय भार्गवी प्रशांत संखे या युवतीने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर किक-कराटे तसेच बॉक्सिंग खेळात प्राविण्य प्राप्त केले आहे. तिचे महत्त्वाचे लक्ष पॅरिस ऑलम्पिक २०२४ आहे. पण तत्पूर्वी भारताने २०२४ या ऑलम्पिकमध्ये कराटे खेळात सहभाग घ्यायला हवा, अशी मागणी तिने केली आहे.

Bhargavi Prashant Sankhe Story
भार्गवी प्रशांत संखे

By

Published : Mar 5, 2023, 7:49 PM IST

Updated : Mar 8, 2023, 7:11 AM IST

मुंबई: सध्याच्या परिस्थितीत भारतीय क्रीडाविश्वाला सुगीचे दिवस आले आहेत असे म्हणतात. परंतु असे असले तरी कराटे व किक बॉक्सिंग हा प्रकार भारतात आता मोठ्या प्रमाणात प्रचलित होत असला तरी सुद्धा ऑलम्पिकमध्ये अजून भारताकडून त्याचा समावेश झालेला नाही. या खेळामध्ये भारतातही भरपूर टॅलेंट असून १८ वर्षीय भार्गवी प्रशांत संखे या युवतीने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळात प्राविण्य प्राप्त केले आहे. तिचे महत्त्वाचे लक्ष पॅरिस ऑलम्पिक २०२४ आहे. परंतु यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक तर भारताने २०२४ या ऑलम्पिकमध्ये कराटे खेळात सहभाग घ्यायला हवा. महिला दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया भार्गवी संखे हिचा या खेळाबद्दल असलेला अनुभव.

भार्गवी प्रशांत संखे माहिती देताना


लहानपणापासून खेळाची आवड:वयाच्या चौथ्या वर्षापासून कराटेची धडे गिरवणारी भार्गवी प्रशांत संखे हीने आतापर्यंत कराटे व किक बॉक्सिंग मध्ये शालेय ते आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ३६० हून अधिक पदके मिळवली आहेत. सतत सहा वर्षे राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत पदक प्राप्त करण्याचा पराक्रमही महाराष्ट्रात भार्गवीच्या नावे आहे. भार्गवीने आतापर्यंत जपान, थायलंड, दुबई, मलेशिया, इंग्लंडमध्ये भारतीय संघातर्फे खेळताना उल्लेखनीय कामगिरी करत देशाचे नाव उंचावले आहे. अगदी लहान वयापासून कराटे तसेच किक बॉक्सिंगमध्ये आपली छाप उमटवणारी भार्गवी २०१९ साली भारतीय खेल पुरस्काराने सुद्धा सन्मानित झाली आहे.

हिंद रत्न पुरस्कारासाठी नामांकन: भार्गवीची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी लक्षात घेत हिंद रत्न पुरस्कारासाठी सुद्धा तिचे नामांकन झाले आहे. म्हणतात ना अनुभवातून माणूस बरेच काही शिकतो. याप्रमाणे भार्गवीने सुद्धा लहान वयापासून या खेळास सुरुवात केल्यामुळे आतापर्यंत ती बऱ्याच गोष्टी अनुभवातून शिकली असून त्याचा फायदा तिला येणाऱ्या भविष्यासाठी होत आहे.

लक्ष २०२४ पॅरिस ऑलम्पिक: भार्गवी सध्या पटियाला यूनिवर्सिटी मधून बीसीएमध्ये दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ज्या पद्धतीने कराटे, किक बॉक्सिंग संदर्भात शिक्षण हवे आहे, ते उपलब्ध नसल्याकारणाने भार्गवीला पटियाला यूनिवर्सिटी मध्ये प्रवेश घ्यावा लागला. सध्या भार्गवी १९ मार्चला जोनपुरला होणाऱ्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये किक बॉक्सिंगची तयारी करत आहे. कराटे या खेळामध्ये जगात रँकिंगमध्ये ४४ क्रमांकावर असणारी भार्गवी प्रशांत संखे हीने आताच वयाची १८ वर्षे पूर्ण केली असून संधी भेटल्यास तिचे लक्ष २०२४ पॅरिस ऑलम्पिक आहे.

भार्गवी जगात ४४ क्रमांकावर: कराटे, किक बॉक्सिंग व भार्गवी हे आता एक समीकरण झाले आहे. कराटे व किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी भार्गवी देश, विदेशात फिरत असते. जगातील ५० प्रमुख कराटे खेळाडूंमध्ये भार्गवी ही ४४ रँकिंगवर असून यावर्षी होणाऱ्या युथ लीग चॅम्पियनशिपची ती तयारी करत आहे. २०२३ एप्रिलमध्ये स्पेनला, जूनमध्ये क्रोएशिया, सप्टेंबरमध्ये मेक्सिको व वर्षाच्या अखेर डिसेंबर मध्ये इटलीला युथ लीग चॅम्पियनशिप होणार आहे. यात भार्गवीचे प्रतिनिधित्व फार महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रतिनिधित्व करण्यास तयार: २०२० मध्ये टोकियोला झालेल्या ऑलिंपिकमध्ये भारताकडून कराटेमध्ये कुठल्याही स्पर्धाकाने भाग घेतला नव्हता. एखाद्या क्रीडा प्रकारात उच्च स्तरावर असणाऱ्या अंतर्गत गट बाजीचा तोटाही कधी कधी त्या खेळासहीत स्पर्धकांनाही सहन करावा लागतो, असेही कराटे या खेळासोबत तर होत नाही ना? अशी शंकाही निर्माण होते. २०२४ ला फ्रान्स येथील पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी भार्गवी फार उत्साहीत आहे. जर भारताकडून २०२४ साठी कराटे टीम पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत समाविष्ट झाली तर त्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भार्गवी तयार असल्याचही तीने सांगितले आहे.

भार्गवीपुढे आर्थिक अडचण:दिवसेंदिवस आपला खेळ उंचावत जाणारी भार्गवी या खेळातील बारकाई पेक्षा या खेळाच्या आर्थिक बाबीवर बोलताना म्हणते की, फायनान्स हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आज मी भारतासाठी खेळते, आंतरराष्ट्रीय स्तरावर कॉमनवेल्थ गेम खेळते, एशियन गेम्स साठी मी क्वालिफाय होणार आहे. आम्ही लहान मुले आई बाबांकडे फार डिमांड करतो व ते आणून सुद्धा देतात. आज माझ्या देशाला, माझ्या समाजाला, माझ्या मित्र-मैत्रिणींना खूप अभिमान वाटतो की आमची मैत्रीण, आमच्या घरातली मुलगी, आज देशासाठी काहीतरी करत आहे. परंतु माझ्या आई-वडिलांच्या डोक्यात हा प्रश्न सतत राहतो की ही मुलगी अजून पुढे खेळणार आहे. खेळातले बारकावे शिकणार आहे, अजून पैसा उभा करावा लागणार आहे.

आर्थिक मदत व्हावी:त्यासाठी पैशांचा बंदोबस्त कसा करायचा. बाबा दैनंदिन त्यांचे काम करत असतात, आई घरात सतत काम करते, पण आम्हाला समजतच नाही, तर हा पैसा येतो कुठून, हा पैसा जमा करण्यासाठी सतत त्यांच्या डोक्यात चक्र सुरू असते. आमची मुलगी छान करते, उत्तम करते, त्यांना खूप बरे वाटते. परंतु प्रत्येक वेळी जमा करावा लागणारा पैसा, शेवटी अडचणच ठरणार आहे. म्हणून फायनान्स हा मुद्दा कधीच माझ्या आई-वडिलांच्या डोक्यातून जात नाही. माझी एवढीच विनंती आहे की आपल्या भारतामध्ये टॅलेंटची कमी नाही आहे. भरपूर टॅलेंट आहे. परंतु त्या खेळाडूंना योग्य प्रकारे फायनान्स न भेटल्या कारणाने ते मागे पडत आहेत. आज माझे आई - बाबा माझ्यासाठी फार मेहनत घेतात. मोठी रिस्क घेऊन मला पुढे जाण्यासाठी मदत करतात. पण हे सर्वच आई - बाबांना शक्य होत नाही. माझी विनंती आहे की याबाबत गांभीर्याने विचार व्हायला हवा.

भार्गवीची यशस्वी कामगिरी -

  1. दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर पार पडलेल्या "आल इंडिया इंटर झोन कराटे चॅम्पियनशिप २०२२" स्पर्धेत वेस्टर्न झोनचे प्रतिनिधीत्व करीत भार्गवी संखे हिने सुवर्णपदक प्राप्त केले.
  2. वेस्ट झोन कराटे चॅम्पियनशीप - २८ ते ३० एप्रिल २०२२, गुजराथ येथे सुवर्ण पदक.
  3. महाराष्ट्र राज्य कराटे चॅम्पियनशीप - १० ते १२ जून, पुणे येथे सुवर्ण पदक.
  4. ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशीप - १७ ते १९ जून, पुणे येथे रौप्य पदक.
  5. ऑल इंडिपेन्डनस कप कराटे चॅम्पियनशीप १३ ते १४ ऑगस्ट, नवी दिल्ली येथे सुवर्ण पदक.
  6. १० वी कॉमनवेल्थ कराटे चॅम्पियनशीप ९ ते १४ सप्टेंबर २०२२, बर्मिंगहॅम, युके मध्ये सहभाग.
  7. राष्ट्रीय किकबॉक्सिंग चॅम्पियनशीप - २७ ते ३० नोव्हेंबर, चंदिगढ येथे २ सुवर्ण पदक.
  8. ऑल इंडिया इंटरझोन कराटे चॅम्पियनशीप २ डिसेंबर २०२२ मध्ये सुवर्ण पदक.
  9. आशियाई किकबॉक्सिग चॅम्पियनशीप १० ते १९ डिसेंबर, थायलंड १ सुवर्ण, २ रौप्य पदक.
  10. फेब्रुवारी २०२३ ला देहरादून ला झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने गोल्ड मेडल मिळवले होते.

हेही वाचा: Durga Deore Success Story: आंतरराष्ट्रीय धावपटू ते उपजिल्हाधिकारी! नाशिकच्या दुर्गा देवरेचा प्रेरणादायी प्रवास, वाचा सविस्तर

Last Updated : Mar 8, 2023, 7:11 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details