मुंबई- एका महिला ज्योतिषावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अभिनेता करण ऑबेरॉयला अटक केली होती. या अटकेनंतर शनिवारी दोन अज्ञात बाईकस्वारांनी ओशिवरा परिसरात येऊन याप्रकरणातील पीडित तक्रारदार महिलेला धक्काबुकी करत धमकावल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.
बलात्कारप्रकरणी करण ओबेरॉय अटकेत, पीडितेला धमक्या - victim
पीडित महिला शनिवारी ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मॉर्निंग वॉकला जात होती. यावेळी तिच्यावर नजर ठेवून बाईकवरून आलेल्या अज्ञातांनी तिच्या अंगावर एक चिठ्ठी फेकत अभिनेता करण ऑबेरॉयच्या विरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी धमकी दिली
याप्रकरणातील पीडित महिला शनिवारी ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मॉर्निंग वॉकला जात होती. यावेळी तिच्यावर नजर ठेवून बाईकवरून आलेल्या अज्ञातांनी तिच्या अंगावर एक चिठ्ठी फेकत अभिनेता करण ऑबेरॉयच्या विरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी धमकी दिली, असा आरोप या महिलेने केला आहे.
या चिठ्ठीत TAKE THE CASE BACK असे इंग्रजीत लिहिल्याचे सांगत आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप या पीडितेने केला आहे. तुर्तास याप्रकरणी पीडित महिलेने ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.