मुंबई- सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबधित अमली पदार्थ प्रकरणाचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबई आणि गोवा येथे छापे टाकत 7 जणांना अटक केली होती. करमजितसिंह याला एनसीबीने दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना करमजितचे वकील अॅड.संदीप कटके यांनी तो मॅनेजमेंटचा विद्यार्थी असून त्याला या प्रकरणात गुंतवले जात असल्याचे म्हटले.
एनसीबीने करमजितला अटक केली तेव्हा त्याच्या घरातून 6 लाख रुपये जप्त करण्यात आले होते. एनसीबीने आज 6 जणांना न्यायायलयात हजर केले होते. व्हॉटसअप चॅटवरून मधून करमजितचे नाव पुढे आले होते. करमजिच्या घरी मिळालेले 6 लाख रुपये त्याच्या आईचे आहेत. त्याच्या आईने दागिने विकून ते पैसे साठवले होते. त्याच्या पावत्या न्यायालयात सादर करु, असे करमजितच्या वकिलांनी सांगतिले.