मुंबई- आज प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाची समाज माध्यमांवर जोरदार चर्चा आहे. अभिनेत्री कंगना राणावतने या आंदोलनावर टीका करताना, या आंदोलनाला समर्थन देणाऱ्यांना दहशतवादी म्हटले आहे.
सहा मोठ्या कंपन्यांनी माझ्याशी केलेला करार मोडला. काही करारांवर मी सही केली होती, तर काहींवर करणार होते. त्यांचे म्हणणे आहे की, मी या तथाकथित शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्यामुळे ते माझ्याशी करार करू शकत नाहीत. आज मी या दंगे भडकवणाऱ्या प्रकारांना समर्थन करणाऱ्या प्रत्येक भारतीयाला आणि अशा देशविरोधी मोठ्या कंपन्यांना दहशतवादी म्हणणे पसंत करते, असे ट्विट करून कंगनाने म्हटले आहे.