मुंबई: सुपरस्टार शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटावर टीका केल्यामुळे अभिनेत्री कंगना राणौतला सोशल मीडियावर सतत ट्रोल केले जात आहे. कंगनाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर पठाण चित्रपटाच्या विरोधात भाष्य केले. कंगनाने चित्रपटाच्या नकारात्मक पैलूंकडे लक्ष वेधले. अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत लिहिले, पठाण द्वेषावर प्रेमाचा विजय असल्याचा दावा करणाऱ्यांशी मी सहमत आहे, पण कोणाच्या द्वेषावर कोणाचे प्रेम आहे? चला समजून घेऊया नक्की कोण तिकीट खरेदी करून यशस्वी करत आहे? होय, हे भारताचे प्रेम आणि सर्वसमावेशकता आहे. जिथे 80 टक्के हिंदू राहतात आणि तरीही पठाण नावाचा चित्रपट आहे. त्याचवेळी, याला प्रत्युत्तर म्हणून नेटकरी तिला ट्विटर आणि इंस्टाग्रामवर सतत ट्रोल करत आहेत.
रणौतने असे केले ट्विट :शनिवारी सकाळी कंगना रणौतने एका ट्विटमध्ये लिहिले की, 'बॉलिवूडवाल्यांनो, तुम्ही या देशात हिंदू द्वेषाने त्रस्त आहात, अशी कथा बनवण्याचा प्रयत्न करू नका, जर मला 'नफरत पर जीत' हे शब्द पुन्हा ऐकू नाही आले तर पाहीजे. तुमच्या यशाचा आनंद घ्या आणि चांगले काम करा, राजकारणापासून दूर राहा.
कंगनाने यूजर्सना दिला रिप्लाय :कंगनाच्या आयुष्यभराच्या कमाईची 'पठाण'शी तुलना मात्र चाहत्यांना फारशी आवडली नाही. कारण त्यांनी आधी चित्रपटाचे कौतुक केले आणि नंतर यू-टर्न घेतला. एका चाहत्याने कंगनाला सांगितले की, 'पठाण'ची एक दिवसाची कमाई ही तिची आयुष्यभराची कमाई आहे. यानंतर कंगनाने यूजर्सना रिप्लाय देत लिहिले, निमो भाऊ, फक्त एक चित्रपट बनवण्यासाठी जो भारताच्या संविधानाचा आणि या महान राष्ट्रावरील आपले प्रेम साजरा करेल त्यासाठी मी माझे घर, माझे कार्यालय, माझ्याकडे असलेले सर्व काही गहाण ठेवले आहे. माझी कमाई उरलेली नाही.