मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत विरुद्ध शिवसेना वाद आता चिघळला आहे. कंगनाच्या मणिकर्णिका या कार्यालयावर महापालिकेने केलेल्या कारवाईविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर तब्बल दोन तासांहून अधिक काळ सुनावणी झाली. कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी युक्तीवाद केला. महापालिकेची कारवाई कशी बेकायदेशीर आहे, असे कंगनाच्या वकिलांकडून न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला आहे.
महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयात ठाम भूमिका मांडली. काही विधाने केली म्हणून त्रास दिला जातोय, असा दावा करता येणार नाही. कंगनाच्या विधानांचा आणि कारवाईचा संबंधच नाही. कंगनाने आधी केलेल्या बेकायदेशीर बदलांवर भूमिका स्पष्ट करावी, मग याचिकेत बाकीचे आरोप करावेत. बेकायदेशीर बांधकाम केलेलेच नाही, ही भूमिका कशी घेता येऊ शकते?, असे महानगरपालिकेच्या वकिलांनी म्हटले आहे.