मुंबई - कंगना रणौतच्या मालमत्तेवरील कारवाईसंदर्भात महापालिकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आजची सुनावणी उद्यावर टळली आहे. कंगनाने संजय राऊत आणि भाग्यवंत लोटे ह्यांना प्रतिवादी करण्याची विनंती हायकोर्टाकडे केली होती. त्यासंदर्भात आता उद्या कोर्टात उत्तर देण्यात येईल.
अभिनेत्री कंगना रणौतनी मुंबई उच्च न्यायालयात बीएमसीच्या प्रतिज्ञापत्रात आपले उत्तर दाखल केले आहे. बीएमसीने तिच्या कार्यालयात केलेली कारवाई पक्षपाती होती, असे कंगनाच्या वतीने म्हटले गेले आहे. सोबतच, कारवाई झाल्यावर कार्यालयात कोणतेही काम सुरू असल्याचे तिने नाकारले आहे.
न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या उत्तरात बीएमसीची कारवाई कशी पक्षपाती असल्याचे म्हटले आहे. पालिकेनं ज्या दिवशी कंगनाला बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावली होती. त्याचवेळी कंगनाच्या बाजूला असलेल्या प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रालाही नोटीस बजावण्यात आला होता. मात्र, त्याला पालिकेकडून ७ दिवसांची मुदत देण्यात आली. तर, मला केवळ २४ तासांची मुदत दिली गेली, असं का, असा सवाल उपस्थित करत कंगनाने बेकायदेशीर बांधकामाबाबत पालिकेने केलेला आरोप फेटाळून लावला आहे. तसेच आपण आपल्या कार्यालयात कोणतेही बेकायदेशीर बांधकाम केलेले नसून पालिकेनं निव्वळ आकसापोटी ही कारवाई केल्याचे कंगनाने आपल्या उत्तरात म्हटले आहे.
हेही वाचा -हे तेच दहशतवादी आहेत; शेतकऱ्यांच्या आंदोलनावर भाजपच्या "झांसे की" राणीची मुक्ताफळे