महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई 'पीओके' असल्यासारखे वाटते; कंगणा रनौतचा संजय राऊतांवर निशाणा - कंगणा रनौत संजय राऊत टीका

अमली पदार्थ विरोधी पथकाची मदत करण्याची इच्छा आहे. मात्र, आपल्याला मुंबई पोलिसांची भीती वाटते, असे अभिनेत्री कंगणा रनौतने म्हटले होते. कंगणाने मुंबईत परत नाही आले तरी चालेल, असे संजय राऊत यांनी सामनामध्ये लिहिले. यावर आता कंगणाने निशाणा साधला आहे.

Kangana Ranaut and sanjay raut
कंगणा रनौत व संजय राऊत

By

Published : Sep 3, 2020, 3:54 PM IST

मुंबई -अभिनेत्री कंगणा रनौत हिने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाना साधला आहे. संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्यासाठी खुली धमकीच दिली असल्याचे कंगणाने म्हटले आहे. मुंबईत पीओकेसारखे वातावरण निर्माण होत असल्याची भावना येत आहे, असे कंगणाने ट्विट करून म्हटले आहे.

कंगणाने बॉलिवूडमधील ड्रग्ज लाईनबाबत माहिती असल्याचे सांगितले होते. तिची अमली पदार्थ विरोधी पथकाची मदत करण्याची इच्छा आहे. मात्र, आपल्याला मुंबई पोलिसांची भीती वाटत आहे. हिमाचल प्रदेश पोलीस किंवा केंद्र सरकारकडून सुरक्षा मिळाल्यास आपण समोर येऊन माहिती देण्यास तयार आहोत, असे कंगणाने म्हटले आहे.

त्यानंतर संजय राऊत यांनी 'सामना'मध्ये लिहिले होते की, मुंबईमध्ये राहत असूनही कंगणाचे मुंबई पोलिसांवर शंका घेणे निंदास्पद आहे. कंगणाने मुंबईत परत नाही आले तरी चालेल, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात कंगणाने शिवसेनेवर निशाणा साधला होता. या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे आल्यानंतर चौकशी करून सत्य समोर यावे, अशी मागणी कंगणाने केली होती. या प्रकरणाला ड्रग्जचे वळण मिळाल्यावर काल कंगणाने रणवीर सिंग, रणबीर कपूर, आयान मुखर्जी आणि विकी कौशल यांनी अँटी ड्रग्ज चाचणीला समोरे जायला हवे, असं ट्विट करून ते पीएमोला टॅग देखील केले होते. काल दिवसभर कंगणाने केलेल्या या आरोपांबाबत माध्यम आणि सोशल मीडियामध्ये एकच चर्चा सुरू झाली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details