मुंबई- शिवसेना आणि कंगना रणौतचा वाद शमण्याची चिन्हे दिसून येत नाहीत. बुधवारी कंगना मुंबईत दाखल होण्यापूर्वी बीएमसीने कारवाई करत तिचे घराचे अनधिकृत बांधकाम पाडले. त्यानंतर बेताल वक्तव्य करणाऱ्या कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तानशी करत शिवसेनेला बाबरसेनेची उपमा दिली होती. मात्र, ती तेवढ्यावरच थांबली नसून कंगनाने आज शिवसेनेला थेट सोनिया सेना म्हणत पुन्हा टीका केली आहे. यावर आता शिवसेनेकडूनही कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.
सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार विकून शिवसेना आता 'सोनिया सेना' झालीय - कंगना - कंगना विरुद्ध शिवसेना
जो विचार घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष स्थापन केला होता. आज सत्तेसाठी त्याच विचारांना विकून शिवसेना सोनिया सेना झाली असल्याची बोचरी टीका कंगना रणौतने शिवसेनेवर केली आहे. तसेच ज्या गुंडांनी माझ्या मागे घर तोडले त्यांना नागरी संस्था म्हणून, संविधांनाचा मोठा अपमान करू नका असेही कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
जो विचार घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष स्थापन केला होता. आज सत्तेसाठी त्याच विचारांना विकून शिवसेना सोनिया सेना झाली असल्याची बोचरी टीका कंगना रणौतने शिवसेनेवर केली आहे. तसेच ज्या गुंडांनी माझ्या माने घर तोडले त्यांना नागरी संस्था म्हणून, संविधांनाचा इतका मोठा अपमान करू नका असेही कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. कंगनाने शिवसेनेला थेट सोनिया सेनेची उपमा दिल्याने शिवसेना आणि कंगना यांच्यात आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
तसेच शिवसेनेला सोनिया सेना संबोधून मुंबईला पाकिस्तान म्हणणारी कंगना एवढ्यावरच थांबली नाही तर तिने ट्विटच्या माध्यमातून आज अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. तुमच्या वडिलांचे चागंले कर्म तुम्हाला संपत्ती देऊ शकते. मात्र, मान सन्मान तुम्हाला स्वत:ला मिळवावा लागतो. माझं तोंड बंद कराल पण माझा आवाज माझ्या नंतर लाखो नागरिकांच्या माध्यमातून बाहेर पडेल. त्यावेळी तुम्ही किती जणांची तोंड बंद करणार? कोणाचा आवाज दाबणार ? किती दिवस तुम्ही सत्यापासून पळ काढणार आहात. तुमचे अस्तित्व काहीच नाही फक्त तुम्ही वंशवादाचे नमुने असल्याचे टीका कंगनाने केली आहे.