महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई : कंगनासह चार जणांवर पुन्हा गुन्हा दाखल, वाचा... - mumbai kangana news

मुंबई पोलिसांनी शुक्रवारी अभिनेत्री कंगना रनौतविरोधात खोटा आरोप केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कंगना, कमल कुमार जैन, रंगोली चंदेल आणि अक्षत राणौत यांच्याविरूद्ध खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

kangana-and-four-others-people-have-beed-charged-again-in-mumbai
मुंबई : कंगनासह चार जणांवर पुन्हा गुन्हा दाखल, वाचा...

By

Published : Mar 13, 2021, 8:06 AM IST

Updated : Mar 13, 2021, 1:57 PM IST

मुंबई - 'दिद्दा : द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीर' पुस्तकाच्या लेखकाच्या कॉपीराइट उल्लंघनाच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी शुक्रवारी अभिनेत्री कंगना रनौतविरोधात खोटा आरोप केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कंगना, कमल कुमार जैन, रंगोली चंदेल आणि अक्षत राणौत यांच्याविरूद्ध खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल -

'दिद्दा : द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीर' या पुस्तकाची हिंदी अनुवादित आवृत्ती 'दिद्दा : काश्मीरची योद्धा राणी' या नावाने आली आहे. काश्मीरची राणी आणि लोहारची राणी दिड्डा (पुंछ) यांचे अधिकार आमच्याकडे आहेत. कंगणाने या पुस्तकावर आणि कथेवर आपला अधिकार कसा सांगितला आहे. हे आमच्या कल्पनाशक्तीपलीकडे असल्याचे या पुस्तकाचे लेखक आशिष कौल यांनी दंडाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून कंगना, कमल कुमार जैन, रंगोली चंदेल आणि अक्षत राणौत यांच्याविरूद्ध खार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

६ वर्षाच्या संशोधनानंतर आशीष कौल यांनी लिहिले दिद्दाचे चरित्र

'दिद्दा द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीर' हे पुस्तक काश्मीरची वीरांगणा महिला शासक असलेल्या दिद्दाचा चरित्रग्रंथ आहे. लेखक आशीष कौल यांनी हे पुस्तक ६ वर्षे संशोधन करुन लिहिले आहे. दिद्दा या भारताच्या पहिल्या महिला शासक होत्या ज्यांनी ४४ वर्षे राज्य केले. सैन्य क्षमता, संघटन कौशल्य, दृढनिश्चय, आत्मविश्वास बाळगणाऱ्या दिद्दा या त्या काळातील पहिल्याच महिला शासक होत्या. अफगानीस्तानहून काश्मीरवर आक्रमण करणाऱ्या शत्रू सेनेला त्यांनी केवळ ४४ मिनीटात हरवले होते आणि त्याचे डोके हात्तीच्या पायाखाली दाबले होते. दिद्दा यांची हिंमत, साहस आणि कुशलता आजच्या नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

कोण होती राणी दिद्दा?

दिद्दा काश्मीरची शासक होती. ती काबुलच्या लोहार राजघराण्याचे राजा सिंघराजांची राजकन्या आणि उत्पल घराण्याची राज्यकर्ती राणी होती. प्राचीन संस्कृत कवी कल्हान यांनी काश्मीरच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली महिला शासक असा दिद्दा यांचा उल्लेख केला आहे.

पराक्रमी 'दिद्दा'!!

महाराणी दिड्डा यांनी काश्मीरवर राज्य गाजवले. तिने शेजारच्या राज्यांवर आक्रमण करुन कधीही त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही. तिच्या पराक्रमाचा लौकीक दूरवर पसरला होता. त्यामुळे परकिय आक्रमण करणाऱ्या शासकांनी त्यांच्या साम्राज्याकडे कधीही वाकडी नजर केली नाही. दिद्दा यांचा विवाह क्षेमेन्द्र गुप्त यांच्याशी झाला होता. दिद्दाचा मृत्यू १००३ मध्ये झाला. ती हयात असेपर्यंत महमूद गजनवी यांनी काश्मीरवर आक्रमण केले नाही. तिच्या मृत्यूनंतर संग्रामराज हा तिचा वारसदार गादीवर बसला. १०१३ मध्ये गजनवीने काश्मीरवर हल्ला केला पण त्यात त्याचा पराभव झाला.

'दिद्दा'बद्दलचा ऐतिहासिक उल्लेख

प्राचीन संस्कृत कवी कल्हण यांनी काश्मिरच्या इतिहासामधील सर्वात शक्तिशाली महिला शासक दिड्डा याचा उल्लेख केला आहे. ती राजा क्षेमगुप्ताची पत्नी होती आणि शारीरिक दुर्बल पतीमुळे तिने आपली पूर्ण शक्ती शासक म्हणून वापरली. पतीच्या निधनानंतर ती सिंहासनावर बसली आणि भ्रष्ट मंत्र्यांना आणि अगदी पंतप्रधानांना देखील तिने आपल्या शासनातून बरखास्त केले होते.

हेही वाचा - मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात.. एकजुटीने लढू आणि जिंकू, मुख्यमंत्र्यांचे मराठा समाजाला आवाहन

Last Updated : Mar 13, 2021, 1:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details