महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

SpiceJet Flight Returns : मुंबईहून कांडलाला जाणारे स्पाईसजेटचे विमान केबिन प्रेशर अलर्टमुळे परतले - SpiceJet Flight Returns

मुंबईहून कांडलाला जाणारे स्पाईसजेटचे विमान केबिन प्रेशर अलर्टमुळे परतले. तथापि, बॉम्बार्डियर Q400 विमानात किती लोक होते हे एअरलाइनने उघड केलेले नाही.

SpiceJet Flight Returns
SpiceJet Flight Returns

By

Published : Feb 18, 2023, 10:35 PM IST

मुंबई :मुंबईहून कांडलाला जाणारे स्पाइसजेटचे विमान केबिनमध्ये 'प्रेशर वॉर्निंग' दिल्यानंतर शनिवारी मुंबई विमानतळावर परतले. स्पाईसजेटकडून आलेल्या निवेदनात विमान सुरक्षितपणे उतरल्याचे सांगण्यात आले आहे. कोणत्याही प्रवाशाने, चालक दलातील सदस्यांनी कोणतीही तक्रार आतापर्यंत नोंदवली नाही. तथापि, Bombardier Q400 विमानात बसलेल्या प्रवाशांची संख्या एअरलाइनने शेअर केलेली नाही.

केबिन प्रेशरायझेशन अलर्ट :स्पाईसजेट एअरलाइनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 18 फेब्रुवारी रोजी स्पाईसजेट क्यू400 एअरलाइनचे विमान फ्लाइट SG-2903 मुंबईवरुन कांडलाला जाणार होते. एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार, 'विमानाने टेक ऑफ केल्यानंतर केबिन प्रेशरायझेशन अलर्ट वाजण्यास सुरवात झाली. त्यामुळे प्रवांशाच्या सुरक्षेच्या कारणांस्तव चालक दलाने तातडीने मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला.

विमानाच्या उड्डान सेवेवर परिणाम : पुढे स्पाइसजेटच्या निवेदनात म्हटले आहे की, पायलटला कळताच त्यांनी लगेचच मुंबई एअर ट्रॅफिक कंट्रोलला संपूर्ण परिस्थितीची माहिती देण्यात आली. विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे. एअरलाइनच्या म्हणण्यानुसार, मुंबई ते तिरुपतीला जाणाऱ्या विमानावरही याचा परिणाम झाला आहे. मात्र कोणत्याही विमानाचे उड्डान रद्द करण्यात आले नाही अशी माहिती विमान कंपनीने दिली आहे. केवळ टेकऑफच्या नियोजित वेळेत बदल करण्यात आला आहे.

याआधी जानेवारीमध्ये पुण्याहून अहमदाबादला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाला एअर कंडिशनिंग सिस्टममध्ये बिघाड झाल्यामुळे टेकऑफच्या आधी टॅक्सीवेवरून पार्किंग बेमध्ये परतावे लागले होते. या फ्लाइटमध्ये (SG-1083) 85 प्रवासी होते.

हेही वाचा -MP Navneet Rana On Uddhav Thackeray : 'जो राम का नहीं, जो हनुमान का नहीं, वो किसी काम का नहीं; उद्धव ठाकरेंवर राणांची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details