महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

​​मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचा खोडसाळपणा अंगलट; माफीनामा देण्याची नामुष्की - ​​मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचा खोडसाळपणा अंगलट

कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या ( Kandivali East Assembly Constituency ) मध्यवर्ती कार्यालयात मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी बैठक बोलावली ( Voter Registration Officers Meeting ) होती. त्यात झालेला खोडसाळपणा अधिकाऱ्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे.

Voter Registration Officer
निवडणूक आयोग

By

Published : Nov 20, 2022, 2:13 PM IST

मुंबई :मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करण्यासंदर्भात कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या ( Kandivali East Assembly Constituency) मध्यवर्ती कार्यालयात मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी बैठक बोलावली ( Voter Registration Officers Meeting ) होती. निमंत्रण पत्रिकेत केलेला अस्तित्वात नसलेल्या पक्षाला निमंत्रण देण्याचा खोडसाळपणा अधिकाऱ्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अखेर माफीनामा देण्याची नामुष्की मतदान नोंदणी कार्यालयावर ओढवली.

मतदार ओळखपत्र आधारकार्डला लिंक :कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघाच्या कार्यालयात मतदार ओळखपत्र आधारकार्डला लिंक करण्या​​चा कार्यक्रम हाती ( Aadhaar Card And Voter ID Link) घेण्यात आला आहे. नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविण्यात येत आहेत. या संदर्भात माहिती देण्यासाठी कांदिवली पूर्व विधानसभा मध्यवर्ती संघाच्या कार्यालयात राजकीय पक्षांची बैठक बोलावण्यात आली होती. मतदान नोंदणी अधिकाऱ्यांनी बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांना निमंत्रित केले होते.


शिवसेनेत दोन गट : शिवसेनेत सध्या दोन गट पडले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ( Uddhav Balasaheb Thackeray Group ) तर शिंदे गटाला (बाळासाहेबांची शिवसेना) असे नाव दिले ( Balasaheb Shiv Sena Group ) आहे. या दोन्ही पक्षांना मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी बैठकीला निमंत्रित करताना, बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख केला. या संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधला. तसेच राज्य निवडणूक आयोगाकडे ही तक्रार केली. निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, नजर चुकीने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. निवडणूक आयोगाने याबाबत अधिकाऱ्यांना खडसावले. तसेच सुधारणा करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सुधारणा करत माफीनामापत्र आयोगाला दिले ( Voter Registration Officers Invite non existent party) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details