मुंबई - पुलवामा दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना कामाठीपुरा येथील गणेशोत्सव मंडळाने श्रद्धांजली वाहिली. यावेळी कामाठीपुरा येथील अखिल कामाठीपुरा सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळाने बाप्पाला कोणतेही वाद्य न वाजवता निरोप दिला.
कामाठीपुरातील गणेशोत्सव मंडळाने हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली - श्रद्धांजली
पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना कामाठीपुरा येथील अखिल कामाठीपुरा सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळाने १५ फुटाचा हुतात्मा स्तंभ उभारुन, तसेच बाप्पाला निरोप देताना कोणतेही वाद्य न वाजवता निरोप दिला.
काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. यात राखीव पोलीस दलाचे ४० पेक्षा जास्त जवानांना वीरमरण आले. या हल्ल्याविरोधात देशभर संतापाची लाट उसळली आहे. हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना मुंबईतील अखिल कामाठीपुरा सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. मंडळाकडून जवानांना श्रद्धांजली म्हणून १५ फुटाचा हुतात्मा स्तंभ बनवण्यात आला. पूर्ण कामाठीपुरात हा स्तंभ फिरवण्यात आला. यानंतर मंडळाने शांततेत तिरंगा खांद्यावर घेऊन गणपतीचे विसर्जन केले. यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.