मुंबई -नागपाडा येथील गजबजलेल्या कामाठीपुरा भागात आग लागल्याची घटना घडली. ( Kamathipura Area Fire Nagpada ) ही घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
नागरिकांची जेवणाची व्यवस्था -

कामाठीपुरा भागातील गल्ली क्र.५ नजीक असलेल्या तळमजला अधिक दोन मजली रहिवाशी इमारतीमध्ये टेरेसकडील भागातील घरात ही आग लागली. पोलीस, बेस्ट वीज विभाग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी तातडीने धावपळ केली. यानंतर इमारतीमधील तीन घरात राहणाऱ्या मुस्लिम कुटुंबातील १५ पेक्षाही जास्त रहिवाशांना वेळीच घराबाहेर काढून समोरील मदरशात स्थलांतरीत केल्याने ते बचावले. त्यांची जेवण व इतर सुविधा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
अग्निशमन दलाने तातडीने ४ फायर इंजिन, ३ जंबो वॉटर टँकर यांच्या सहाय्याने या आगीवर एका तासात नियंत्रण मिळविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला, अशी माहिती काँग्रेसचे नगरसेवक जावेद जुनेजा यांनी दिली. दरम्यान, आगाचे कारण अस्पष्ट असून याबाबतची माहिती अग्निशमन दल व पोलीस घेत असून तपास सुरू आहे.