महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कल्याण ते हजरत निजामुद्दीन पार्सल ट्रेन 8 एप्रिलला सुटणार - Hazrat Nizamuddin train

सामान, पार्सल वाहून नेण्यासाठी कल्याण ते हजरत निजामुद्दीन पार्सल ट्रेन चालवण्याची घोषणा मध्य रेल्वेने केली होती. त्याप्रमाणे 8 एप्रिलला ही ट्रेन सुटणार आहे.

Kalyan to Hazrat Nizamuddin parcel train
कल्याण ते हजरत निजामुद्दीन पार्सल ट्रेन 8 एप्रिलला सुटणार

By

Published : Apr 4, 2020, 5:30 PM IST

मुंबई - मध्य रेल्वेने सामान, पार्सल वाहून नेण्यासाठी कल्याण ते हजरत निजामुद्दीन पार्सल ट्रेन चालवण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. ही रेल्वेगाडी दिनांक 8 एप्रिलला सकाळी 8 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी हजरत निजामुद्दीन येथे 5.40 ​​वाजता पोहोचेल.

आता ही ट्रेन पुढील वेळापत्रकानुसार सुटेल.

00107 पार्सल ट्रेन कल्याण येथून दिनांक 8 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता सुटेल आणि हजरत निजामुद्दीन येथे दुसर्‍या दिवशी 5.40 ​​वाजता पोहोचेल.


इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, होशंगाबाद, भोपाळ, विदिशा, गंज बासोदा, बीना, झांशी, ग्वाल्हेर, आग्रा छावणी या स्थानकात या गाडीला थांबे देण्यात आले आहेत. मागणी वाढल्यास गाडीची वारंवारताही वाढवली जाणार आहे.

जर एखादे पार्सल तातडीने पोहोचवण्यासाठी वाटेतील स्थानकांवर न थांबताही रेल्वे चालवली जाऊ शकते. कोणत्याही गतव्यस्थानासाठी पार्टीद्वारे पूर्ण पार्सल ट्रेनची मागणी केल्यास, सेवा प्रदान करण्यासाठी मध्य रेल्वे तत्परतेने कार्य करेल. 14 एप्रिलपर्यंत सुरू होणाऱ्या सेवांसाठी हे वैध आहेत. आवश्यकतेनुसार आणि मागणीनुसार कोणत्याही दिवसासाठी या वेळापत्रकात बदल केले जाऊ शकतात. या गाड्यांमध्ये प्रवाशांना प्रवेश दिला जाणार नाही.


संपर्क तपशीलः
वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मुंबई - 8828119950
वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, भुसावळ - 7219611950
उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक, फ्रेट सर्व्हिसेस - 8828110963
सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक, फ्रेट सर्व्हिसेस - 8828110983
मुख्य वाणिज्य निरीक्षक, फ्रेट सर्व्हिसेस - 7972279217

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details