महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kalicharan Maharaja on Hindu Gods : हिंदू देव देवता हिंसक, खुनी; कालीचरण महाराजाचे वादग्रस्त विधान - हिंदू देव देवता हिंसक

कालीचरण महाराजांनी वादग्रस्त विधान केले की, छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj ) मारामाऱ्या करायचे, हिंदू देव देवता हिंसक, खुनी ( Hindu Gods are violent and murderous ) आहेत. या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हिंदू धर्मातील देव देवतांनी आपल्यासाठी मारामाऱ्या केल्या नसत्या तर आपण त्यांना पूजले असते का? असा सवाल करून त्यांनी धर्मासाठी आणि देशासाठी खून करणे वाईट नाही असे सांगत खुनाच्या घटनांचे एकप्रकारे समर्थन ( Controversial statement on Hindu Gods ) केले आहे.

Kalicharan Maharaja on Hindu Gods
कालीचरण महाराजाचे वादग्रस्त विधान

By

Published : Dec 26, 2022, 12:52 PM IST

मुंबई : राज्यात छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj ) आणि महापुरुषांची बदनामीमुळे वातावरण तापले ( atmosphere heated due to defamation of great men ) असताना कालीचरण महाराज याने छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू देव देवता हिंसक असून हिंदू धर्मासाठी आणि देशासाठी मारामाऱ्या आणि खून करत असा वादग्रस्त विधान केले आहे. एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ( Controversial statement of Kalicharan Maharaja )


वादग्रस्त विधाने करण्याची स्पर्धा सुरू :छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबाबत सतत वादग्रस्त विधाने करण्याची स्पर्धा राज्यात सुरू आहे. छोट्या छोट्या गोष्टींच्या उदाहरणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य गाथाचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने समोर आणला जात असल्याचे वरचेवर दिसून येत आहे. राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचा वाद धुमसत असताना, कालीचरण महाराज याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, गुरु गोविंदसिंग महाराज, राणा प्रतापसिंह महाराज मारामाऱ्या केल्या. हिंदू धर्मातील देव देवतांनी आपल्यासाठी मारामाऱ्या केल्या नसत्या तर आपण त्यांना पूजले असते का? असा सवाल करून त्यांनी धर्मासाठी आणि देशासाठी खून करणे वाईट नाही असे सांगत खुनाच्या घटनांचे एकप्रकारे समर्थन केले आहे.यामुळे राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. खून करण्याचे समर्थन करताना कालिचरण महाराज यांनी हिंदू देव-देवतांची नाव घेतली. पण त्याचबरोबर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचाही उल्लेख हिंसक म्हणून केला आहे. यावरुन आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. देशात एकीकडे धर्मावरून वाद वाढत असताना कालिचरण महाराज सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत आहेत.

कालीचरण महाराज कोण आहेत ? यापूर्वी कालीचरण उर्फ अभिजीत धनंजय सराग यांनी महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते. डिसेंबर 2021 मध्ये या प्रकरणाच्या संदर्भात त्यांना अटक देखील करण्यात आली होती, परंतु नंतर 1 लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक आणि प्रत्येकी 50,000 रुपये किमतीच्या दोन जामिनावर जामीन मंजूर करण्यात आला. रायपूरमधील एका कथित धर्म संसद मध्ये बोलताना, वादग्रस्त धार्मिक नेत्याने महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप केला होता आणि लोकांना धर्माच्या रक्षणासाठी एक मजबूत हिंदू नेता निवडण्याचे आवाहन केले होते. महाराष्ट्रातील अकोला येथे 1973 मध्ये अभिजीत धनंजय सराग यांचा जन्म झाला. कालीचरण महाराज हे एक स्वयंभू आध्यात्मिक नेते आहेत. शाळा सोडलेल्या, सारगला त्याच्या पालकांनी इंदूरला पाठवले होते. लहानपणी त्यांनी धार्मिक पुस्तकांचा अभ्यास केला आणि अध्यात्माकडे आकर्षित झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details