मुंबई - आमदार राहुल सिद्धिविनायक बोन्द्रे यांना हात दाखवणाऱ्या सराईत चोराला पोलिसांनी अटक केली. बोन्द्रे यांचे पाकीट, मोबाईल आणि रोकड चोरीला गेली होती. आरोपीला रेल्वे पोलिसांनी 48 तासाच्या आत अटक केली आहे.
काँग्रेस आमदाराचे पाकीट मारणारा गजाआड; रेल्वे पोलिसांनी लावला 48 तासात छडा - मुद्देमाल
आमदार राहुल सिद्धिविनायक बोन्द्रे यांचे पाकीट, मोबाईल आणि रोकड चोरीला गेले होते. रेल्वे पोलिसांनी 48 तासाच्या आत आरोपींना अटक केली आहे.
बोन्द्रे हे 23 जूनला विदर्भ एक्सप्रेसमधून मुंबईसाठी प्रवास करत होते. दरम्यान कल्याण रेल्वे स्थानकावर गाडी थांबली. हीच संधी साधून आरोपीने बर्थवर ठेवलेले त्यांचे पाकीट, मोबाईल आणि त्यातली रोख रक्कम लंपास केली आणि पसार झाला. याबाबतची तक्रार बोन्द्रे यांनी रेल्वे पोलिसांकडे केली. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत आरोपी अहमद हबीबअली सैय्यदला कल्याण येथून अटक केली.
आरोपीकडून पोलिसांनी चोरीस गेलेला मुद्देमाल आणि रोकड जप्त केली आहे. कल्याण न्यायालयात त्याला हजर केला असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. अटकेत असलेला आरोपी सराईत गुन्हेगार आहे.