मुंबई Jyoti Waghmare On Sanjay Raut :सरकारने मराठा आरक्षणाबाबत महत्वाचे निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र तपासणीसाठी गोळा करण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या इम्परिकल डेटा मागासवर्ग आयोग लवकरच गोळा करायला सूरुवात करणार आहे. यांचा प्रत्येक आठवड्याला रिपोर्ट मुख्यमंत्री घेणार आहेत, त्यामुळं मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आरक्षण मिळवून देणार, असा विश्वास शिंदे गटाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केला. त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली असता, यावेळी त्या मुबंईतील बाळासाहेब भवन येथे बोलत होत्या.
मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आरक्षण मिळवून देणार. तर संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे, ते रोज उठून ड्रग घेऊन बोलत आहेत. "लाज अब्रू आणि मी कशाला घाबरु" असंच काहीसं संजय राऊत यांचं झालं आहे. महाविकास आघाडी नव्हे तर महाड्रग आघाडी आहे. - ज्योती वाघमारे, प्रवक्त्या
शेतकऱ्यांसाठी सरकारचा पुढाकार: अंतरवाली सराटीमध्ये जरांगे-पाटील यांच्या सभेसाठी ज्या शेतकऱ्यांनी स्वत: उभ्या पिकाची काळजी न करता पीक कापले आणि सभेसाठी मैदान उपलब्ध करून दिले. अश्या 441 शेतकऱ्यांच्या शेतीसाठी राज्य सरकार एकूण 32 लाख रुपये नुकसान भरपाई देणार आहे. हे नुकसाभरपाई देण्याची सुरूवात करण्यात आली आहे. अशी माहिती वाघमारे यांनी दिली.
सामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून...: यावेळी वाघमारे यांना मुख्यमंत्र्यांनी सुरक्षारक्षकास मारल्याचा व्हीडिओ व्हायरल होतोय, असा प्रश्न विचारला असता, यावर ज्योती वाघमारे म्हणाल्या की, रश्मी ठाकरे यांचा केदारनाथ मंदिरातला व्हीडिओ पहिला का? स्वत:च्या युवराजाना मध्ये उभं करण्यासाठी शेजारी उभे असलेल्या कार्यकर्त्यांना कश्या बाजूला सारत आहेत. आमचे मुख्यमंत्री हे सर्वसामन्यांचे मुख्यमंत्री आहेत. ते सर्वांना भेटतात फक्त घरात बसत नाही, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. ते कार्यकर्त्यांना भेटत होते. स्वत:च्या सुरक्षेची काळजी न करता ते सर्वांना भेटतात म्हणून असं घडलं.
एल्विश यादव आमचा जावई नाही :एल्विश यादवने (Elvish Yadav) वर्षा बंगल्यावर आरती करुन गेला, असं विचारले असता, दररोज सकाळी उठून कोणता चरस, गांजा घेऊन आरोप करतात. त्यांना विचारा की, तुम्हाला एल्विश यादव दिसतो पण तुम्हाला इर्शाळवाडी मधील अनाथ मुलं नाही दिसली. ललित पाटील उद्धव ठाकरेंसोबत होता, सुप्रिया सुळे या, जितेंद्र आव्हाड यांचासोबात ड्रग डीलर यांच्या बरोबर फोटो काढतात. तर आदित्य ठाकरे दिनो मोरियो सोबत काय करत होते? असा सवाल वाघमारे यांनी उपस्थित केला. एल्विश यादव आमचा जावई नाहीय. आमच्याकडे येऊन तो गणपती आरती करत होता. तुम्ही तर तुमच्याकडे येणाऱ्यांची आरती करता, अशी टीका वाघमारे यांनी विरोधकांवर केली.
हेही वाचा -
- Devendra Fadnavis : एल्विश यादव प्रकरणावरुन संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप; उपमुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर
- Sanjay Raut On Eknath Shinde : 'ड्रग्ज प्रकरणाची सूत्रं मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का?' राऊतांचा खोचक सवाल
- New Export Policy : राज्याचे नवे निर्यात धोरण, जाणून घ्या निर्यातीसाठी काय आहेत प्रस्ताव