मुंबई :मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. एस. पटेल यांनी बुधवारी एका प्रकरणाची तातडीची सुनावणी देण्यास नकार दिल्यावर विनोदी पद्धतीने न्यायाधीशांच्या दीर्घ कामकाजाच्या तासांवर लक्ष केंद्रित केले. तब्बल 16 प्रकरणांवर सुनावणी घेतल्यानंतर दुपारी 4.30 वाजता खंडपीठ दिवसभरासाठी उठणार होते. यावेळी, एका वकिलाने त्यांची बाब नमूद केली की, याचिका बाबत आज बोर्डावर सूचीबद्ध आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनीदेखील मांडला होता मुद्दा :त्यानुसार त्यांनी निकडीने ती याचिका सुनावणीस घ्यावी.मात्र वकिलाच्या तातडीने याचिका सुनावणीस घेण्याच्या अग्रहानंतर मात्र न्या.जी एस पटेल यांनी न्यायालयात जो खटल्यांचा ढीग पडला आहे. याकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.ते लक्ष वेधण्यासाठी गमतीने आपल्या भावना सहज उत्स्फूर्तपणे व्यक्त केल्या. न्यायमूर्तींनी ज्या रीतीने प्रलंबित खटले प्रकरणे याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्या घटनेवरून सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनी देखील काही दिवसांपूर्वी
न्यायालयातील वाढते खटले आणि न्यायालयीन कामकाजसाठी असणारे मनुष्यबळ अपुरे असल्याने खटले प्रलंबित राहतात.ही बाब सार्वजनिकरित्या व्यक्त केली होती. त्याच धर्तीवर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. एस. पटेल यांनी वाढते खटले बाबत चिंता व्यक्त केली.