मुंबई- वेबसाईटवर निकाल पाहिल्यावर पहिल्यांदा माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. त्यानंतर माझ्या आईला माझ्या नातेवाईकांनी मी देशात पहिली आल्याचे फोन करून सांगितले. त्यानंतर आम्हाला एकच आश्चर्याचा धक्का बसला. आई-वडिलांनी मला मिठीत घेतले आणि आम्ही तशीच शाळा गाठली, अशी प्रतिक्रिया दिली आहे देशात आयसीएसईत ऑल इंडिया मेरील लिस्टमध्ये पहिली आलेल्या जुही कजारियाने हिने.
निकाल पाहिल्यावर मला विश्वासच बसला नाही - जुही कजारीया
जुहू येथील जमनाबाई नरसी स्कुलमधील जुही कजारिया ही आयसीएसईत ऑल इंडिया मेरील लिस्टमध्ये पहिली आली आहे. तर याच शाळेतील फोरम संजनावाला ही देशात दुसरी आली आहे. या निकालानंतर आम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याची प्रतिक्रिया या दोघींनी दिली आहे.
जुही कजारिया ही जुहू येथील जमनाबाई नरसी स्कुलची विद्यार्थिनी आहे. पुढे कॉमर्समध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेऊन अभियांत्रिकी शाखेत जाणार असल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली, शाळेच्या शिक्षकांनी मला नेहमीच पाठींबा दिला. माझ्या प्रश्नांचे व समस्यांचे वेळोवेळी निराकरण केले. अनेक पेपर सोडवले. वाचन व लिखाण या माझ्या छंदाचा फायदा मला परीक्षेत झाल्याचे जुहीने सांगितले. जुहीचे वडील व्यवसायाने अकाऊंट असून आई त्यांच्या व्यवसायात हातभार लावते. जुही देशात प्रथम येईल, हे आम्हाला अपेक्षित नव्हते. मात्र, आता आमचा आनंद गगनात मावत नसल्याचे जुहीची आई रिद्धी रुपेश कजारीया यांनी सांगितले.
याच शाळेतील फोरम संजनावाला ही देशात ९९.०४ टक्के गुण दुसरी आली. निकाल पाहिल्यावर मला खूप आनंद झाला तर एकीकडे मला आश्चर्याचा धक्काही बसल्याची प्रतिक्रिया फोरमने व्यक्त केली. परीक्षेच्या तयारीसाठी अनेक पेपर सोडवले. या सर्वांचे श्रेय मी आजी, आजोबा, बहीण, आई, वडील व शिक्षक वर्गाला देते. भविष्यात इंजिनिअरिंग क्षेत्रात जाणार असून गुगलमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे फोरमने सांगितले. फोरमची आई फाल्गुनी, वडील सौरभ हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. फोरमच्या यशामुळे आम्ही सर्वच भारावलो, अशी प्रतिक्रिया तिच्या पालकांनी व्यक्त केली.