ठाणे :सिने अभिनेत्री जुही चावला हिने मुंबईच्या हवेत दुर्गंधी असल्याचे ट्विट केले. तिच्या ट्विटवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी खोचक टोला लगावत अभिनेत्री जुहीला मुंबई सोडण्याचा सल्ला (Advice to Juhi to leave Mumbai) दिला. तर आगामी महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेची युती करणे म्हणजे भाजपच्या इमेजला धक्का लागल्याची शक्यता (BJP image will hurt by Raj Thackeray) असल्याचे सांगत राज ठाकरेंवर निशाणा (Ramdas Athawale criticizes Raj Thackeray) साधला. मंत्री आठवले हे दलित पँथर चळवळीच्या ५० वर्ष कालावधी लोटल्याने या संघटनेच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून कल्याणामधील आचार्य अत्रे रंगमंदिरात उपस्थित होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिनेत्री जुही चावलावर खोचक टीका (Ramdas Athawale criticizes Juhi Chawla) करत राज ठाकरेंशी असलेल्या मतभेदावरही त्यांनी भाष्य केले.
Ramdas Athawale Criticizes Juhi Chawla : जुही चावलाने मुंबई सोडून जावे;.. तर राज ठाकरेंमुळे भाजपच्या इमेजला धक्का, रामदास आठवले - रामदास आठवले यांची जुही चावलावर टीका
अभिनेत्री जुही चावला हिने मुंबईच्या हवेत दुर्गंधी असल्याचे ट्विट केले. तिच्या ट्विटवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी खोचक टोला लगावत अभिनेत्री जुहीला मुंबई सोडण्याचा सल्ला (Advice to Juhi to leave Mumbai) दिला. तर आगामी महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेची युती करणे म्हणजे भाजपच्या इमेजला धक्का लागल्याची शक्यता (BJP image will hurt by Raj Thackeray) असल्याचे सांगत राज ठाकरेंवर निशाणा (Ramdas Athawale criticizes Raj Thackeray) साधला. (Ramdas Athawale criticizes Juhi Chawla)
‘तर’ भाजपच्या इमेजला धक्का -आगामी महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंसोबत युती करणार का ? या प्रश्नवर मात्र मंत्री आठवले यांनी सावध पवित्रा घेत, राज ठाकरेंना माझा विरोध नाही. मात्र त्यांच्या भूमिकेबद्दल माझे मतभेद असून मग तो भोंगाविषयी असो वा उत्तर भारतीयांचा विषय या दोन्ही बाबत विचार केला. तर भाजपचे हिंदी भाषिक राज्यात बऱ्यापैकी वर्चस्व आहे. त्यामुळे जर राज ठाकरेंशी भाजपने युती केली तर भाजपाच्या इमेजला धक्का लागण्याची शक्यता असल्याचे मंत्री आठवले यांनी सांगितले. येणाऱ्या मुबंई , ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह इतर महापालिका निवडणुकीत रिपाई, (आ ) भाजपा आणि शिंदे गट मिळून लढणार असल्याने राज ठाकरेंच्या मनसेची आवश्यकता नसल्याचे विधान करत राज ठाकरेंवर निशाणा साधला.
मुंबई शहराला आगळेवेगळे महत्त्व -कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिरात जेष्ठ दलित साहित्यिक तथा विचारवंत लेखक पँथर डॉ. प्राध्यापक विठ्ठल शिंदे यांच्या दलित पँथर क्रांतिकारी नोंदी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते काल रात्री पार पडला. या पुस्तकात दलित पँथर चळवळीच्या ५० वर्ष कालावधी लोटल्याने या संघटनेच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी जूही चावलाच्या ट्विटबद्दल विचारले असता, मुंबई आवडत नाही तर मुंबई सोडून जा, अशी आठवलेंनी खोचक टिप्पणी करत आजही मुंबईतील अनेक भागात झोपडपट्याचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असून तो प्रश्न सोडविण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली आहे. मुंबई शहरात महानायक अमिताभ बच्चनसह अनेक कलाकार राहतात. त्यामुळे मुंबई शहराला आगळेवेगळे महत्त्व असून जुही चावल्याच्या मताशी मी सहमत नसल्याचे सांगत अभिनेत्री जुही चावला यांना मुंबई सोडून जाण्याचा सल्ला मंत्री आठवले यांनी दिला.