जे. पी. नड्डा यांचा महाराष्ट्र दौरा मुंबई :दोन दिवसीय राज्य दौऱ्यावर नड्डा यांनी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी भेट घेतली आहे. यावेळी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार हे नेते देखील उपस्थित होते. भाजपने आयोजित केलेल्या आणि विविध सरकारी योजनांचे लाभार्थी उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना नड्डा यांनी दावा केला की अमेरिका, चीन आणि जपान आता आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. कारण त्यांनी कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान मोफत सुविधा देण्यासाठी पैसे खर्च केले आहेत. ते म्हणाले, भारत सरकारने त्या काळात पायाभूत सुविधा, कृषी आणि इतर क्षेत्रांना चालना देण्यासाठी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज आणले होते, असे ते म्हणाले.
मुंबई शहराचा पुढचा महापौर भाजपचाच असेल, अशा पद्धतीने आपण सर्वांनी काम केले पाहिजे. - जेपी नड्डा
सरकारचे जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष : महाविकास आघाडी सरकारमध्ये वरपासून खालपर्यंत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नड्डा यांनी केला. सर्व विकासकामे ठप्प झाली आहेत. हे सरकार विकासाची आणि पायाभूत सुविधांच्या विकासाची सर्व कामे अडवते, असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली एनडीएचे दुहेरी इंजिन असलेले सरकार महाराष्ट्रातील जनतेची काळजी घेत आहे. त्यांच्या सर्व आकांक्षा आणि इच्छा पूर्ण करत असल्याने ही परिस्थिती बदलल्याचे ते म्हणाले. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देत असल्याचे ते म्हणाले.
नड्डा जिथे जातात तिथे भाजपचा पराभव :नड्डा यांच्या भेटीवर बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी दावा केला की, नड्डा जिथे जातात तिथे भाजपचा पराभव होतो. नड्डा त्यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी कर्नाटकात राहिले, पण त्यांचा पराभव झाला. आता ते महाराष्ट्रात येत आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करतो. परंतु ते जिथे जातात तिथे भाजपचा पराभव होतो, असे त्यांनी नाशिकमध्ये पत्रकारांना सांगितले होते. जेपी नड्डा आज पुण्यात असणार आहेत.
हेही वाचा :
- JP Nadda Maharashtra Visit : जे.पी. नड्डा मुंबईत पोहोचले, कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत
- Sanjay Raut On JP Nadda : नड्डा जिथे जातात तिथे भाजपचा पराभव होतो; संजय राऊतांची टीका
- JP Nadda Maharashtra Visit : कर्नाटक निकालानंतर जेपी नड्डा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर; आगामी निवडणुकांबाबत रणनिती?