मुंबई- शहरातील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज भाजप महाराष्ट्र प्रबुद्ध संमेलन पार पडले. भाजपतर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या नेतृत्वाखाली हे सम्मेलन पार पडले. यात नड्डा यांनी भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रामध्ये केलेली विकास कामे व आगामी काळात भाजप सरकारकडून घेण्यात येणाऱ्या प्रकल्पांबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर नड्डांनी गुड गव्हर्नन्सचे गुणगान गाईले. या कार्यक्रमाला भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते व राष्ट्रीय प्रवक्ते उपस्थित होते.
संमेलनाला शहरातील प्रतिष्ठित तसेच बुद्धीजीवी लोक उपस्थित होते. त्यामध्ये हिरानंदानी, यश बिरला, अब्बासी, महेंद्रा असे अनेक सुप्रसिद्ध उद्योजक व सांस्कृतिक संस्था चालवणारे लोकांचा समावेश आहे. कार्यक्रमाप्रसंगी नड्डा यांनी संमेलनात भाजप सरकारने केंद्रात व राज्यात सत्तेत केलेल्या विकास कामांची माहिती दिली व गुड गव्हर्नन्सचा लोकांना कसा फायदा होतो आहे याबद्दल सांगितले.
९९ टक्के देश हागणदारी मुक्त झालेला आहे. खेड्यापाड्यात मोठ्याप्रमाणात वाहतुकीसाठी रस्ते करण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणी पाणी पोहोचले नाही त्याठिकाणी देखील पाणी पोहोचविण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. तसेच शहराच्या विकासासाठी मेट्रो प्रकल्पाचे काम देखील सुरू आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, उज्वला योजना, आयुष्यमान योजना, अशा सरकारच्या अनेक कामांवर चर्चा करित त्यांनी ईतर विषयावर शहरातील बुद्धीजीवी लोकांशी चर्चा व मार्गदर्शन केले.