मुंबई :अभिनेत्रीच्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून चित्रपट निर्माता सुभाष कपूर ( Jolly LLB producer Subhash Kapoor ) यांची बांद्रा न्यायदंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष मुक्तता ( Subhash Kapoor acquitted in sexual assault case ) केली आहे. अभिनेत्री महिला च्या तक्रारीच्या आधारे 2014 मध्ये सुभाष कपूर यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. अभिनेत्रीची 2012 मध्ये सुभाष कपूर यांच्या निवासस्थानी लैंगिक अत्याचार ( sexual assault case ) केलाचा आरोप अभिनेत्री पीडित महिलेने केला होता. निकालाचा तपशीलवार आदेश अद्याप उपलब्ध होणे बाकी आहे.
खोटे आरोप लावण्यात आले : न्यायालयाने कपूर यांची भारतीय दंड संहितेच्या कलम 354 अंतर्गत लैंगिक छळासह विविध आरोपातून निर्दोष मुक्तता केली. कोर्टाने दानिश हैदरची निर्दोष मुक्तता केली. आयपीसीच्या कलम 34 नुसार सामान्य हेतूच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. कारण तक्रारकर्त्याने अभिनेत्री महिलेने आरोप केला होता की त्याने कपूरला तिच्यासोबत एकटे राहण्याची परिस्थिती निर्माण केली होती. कपूर आणि हैदर या दोघांनीही आरोप फेटाळून लावले होते. आणि म्हटले होते की अशी घटना केव्हाच घडली नाही तक्रारदार महिलेने आम्हाला या प्रकरणात खोटे गोवण्यात आले होते.
काय आहे प्रकरण : फिर्यादीने म्हटले होते की 28 मे 2012 रोजी रात्री जेवण आणि मद्यपान केल्यानंतर काही मित्र तिच्या घरी आले होते. पहाटे 2.30 ते 3 च्या सुमारास ते दोघे निघून गेले तर कपूर बेडरूमच्या दिशेने गेले. थोडावेळ तो परत न आल्याने फिर्यादीने हैदरला त्याची तपासणी करण्यास सांगितले. हैदरने पीडितेला सांगितले की कपूरची तब्येत बरी नसल्याने तो बेडरूममध्ये आराम करत होता. काही वेळानंतर हैदर काही तातडीच्या कामाच्या बहाण्याने निघून गेला. नंतर अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार कपूर उठला आणि प्रथम तिच्या बाजूला सोफ्यावर बसला आणि नंतर जवळ आला आणि तिच्याशी गैरवर्तन केले.
यामुळे केली होती तक्रार दाखल : निर्माता सुभाष कपूर यांच्या वतीने युक्तिवाद करणाऱ्या वकिलांनी म्हटले की, कपूर विरोधात एफआयआर नोंदविण्यात दोन वर्षांच्या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. बचाव पक्षाने कथित घटनेनंतर वर्षाच्या उत्तरार्धात शूटिंग आणि इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये तक्रारदाराची छायाचित्रे देखील सादर केली होती कृत्य घडल्याचे तिच्या वर्तनातून दिसून आले नाही. तक्रारदाराला चित्रपटात भूमिका देण्यास नकार दिल्याने ही तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावाही कपूर यांच्या वतीने करण्यात आला होता.
युक्तीवाद करण्यात आला : फिर्यादी आणि पीडितेच्या वकिलाने असे म्हटले की, बचाव पक्ष ती परिपूर्ण पीडित नसल्याचे चित्रण करण्याचा प्रयत्न करत आहे. आरोपीने बदनामीकारक विधाने केल्याचेही पीडितेने सादर केले होते. त्यामुळे तक्रारदाराला मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये काम मिळत नव्हते तक्रार दाखल केल्यापासून ती त्याचा परिणाम सहन करत होती. पीडित महिलेच्या वतीने वकील अनुभा रस्तोगी यांनी असा युक्तिवाद करण्यात आला की एफआयआर ताबडतोब दाखल करण्यात आला नाही कारण तिने आरोपीला उच्च आदरात ठेवले होते. तिच्या विश्वासाचा भंग केल्यामुळे तिला सामोरे जावे लागले होते. आरोपींनी थेट आणि इतरांच्या माध्यमातून तिला तक्रार न करण्याची विनंती केल्याचा आरोपही करण्यात आला.