महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Presidential elections: राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांची संयुक्त बैठक - Joint meeting of NCP and Congress MLAs

18 जुलैला राष्ट्रपती निवडणूक (Presidential elections) होणार असून या निवडणुकीत यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा हे आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांची संयुक्त बैठक (Joint meeting of NCP and Congress MLAs) बोलवण्यात आली असून, 17 जुलैला यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही बैठक पार पडणार आहे.

Sharad Pawar
शरद पवार

By

Published : Jul 13, 2022, 7:52 PM IST

मुंबई:18 जुलैला राष्ट्रपती निवडणूक (Presidential elections) होणार असून या निवडणुकीत यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा हे आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांची संयुक्त बैठक (Joint meeting of NCP and Congress MLAs) बोलवण्यात आली असून, 17 जुलैला यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहतील. या बैठकीतून सर्व आमदारांना राष्ट्रपती निवडणुकीबाबत ज्येष्ठ नेत्यांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. मतदान करताना आमदारांकडून चुका होऊ नयेत, यासाठी ही बैठक बोलवण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.


शिवसेनेकडून द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा:राष्ट्रपती निवडणुकीत महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेनेने, एनडीएच्या राष्ट्रपतीपदासाठी असलेल्या उमेदवार द्रोपती मुर्मु यांना पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे या भूमिकेमुळे काँग्रेस नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. मात्र राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत नेहमीच शिवसेना उमेदवार पाहून आपली भूमिका जाहीर करत असते ,अशी पाठराखण राष्ट्रवादी काँग्रेस कडून करण्यात आली आहे.

हेही वाचा:Laxman Vyas On Ashok Stambh : दिल्लीतील अशोक स्तंभाच्या वादानंतर शिल्पकार लक्ष्मण व्यास चर्चेत, जाणून घ्या त्यांचे मत

ABOUT THE AUTHOR

...view details