मुंबई : राज्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांनी आघाडी केल्याची घोषणा आज ( Jogendra Kawade over alliance ) केली. राज्याला धाडसी मुख्यमंत्री लाभला असून त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे आघाडी केली. या आघाडीमुळे महाराष्ट्राला नवी दिशा दिली जाईल, असे प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर कवाडेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामावरून टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित ( Balasaheb Thackery Shiv Sena and People Republican Party alliance ) होते.
युती सत्ता स्थापन : राज्यात 2019 च्या सत्तांतर नाट्यानंतर युती, आघाडी करण्यावर सर्वच राजकीय पक्षांनी भर दिला आहे. सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फुट पाडत, भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली. बहुजन वंचित आघाडी महाविकास आघाडीत सामील होण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट केले. राज्यात शिवसेना आणि वंचित एकत्र येण्याची चर्चा सुरु होती. अशातच प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षासोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेब भवन येथे संयुक्त पत्रकार परिषद घेत, या निर्णयाची घोषणा ( will give new direction to Maharashtra ) केली.
सामान्य जनतेचं सरकार : प्रा. कवाडे म्हणाले की, बऱ्याच दिवसांपासून या युतीची बोलणी सुरु होती. महाराष्ट्राला आज एक धाडसी मुख्यमंत्री लाभला आहे. हे सर्व सामान्य जनतेचं सरकार आहे. ही पावती सर्वसामान्य जनतेने दिली आहे. सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभल्याचे सांगत, मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळली. मुख्यमंत्र्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आम्ही या आघाडीचा निर्णय घेतला. शिवराय, शाहू-फुले-आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांची ही आघाडी आहे. गोरगरीबांच्या वंचितांच्या हक्कासाठी आम्ही काम करु, असे ही त्यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यभरात पाच जाहीर सभा घेणार असल्याचे ते म्हणाले.
ठाकरेंवर टीकास्त्र सोडले : बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत वारंवार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भेट ( Jogendra Kawade criticize Udhav Thackery ) घेतली. तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची ही भेट घेतली. पण आमच्या निवेदनाची साधी दखल घेतली नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदेंना याच बाबतीत भेटलो असता, बाबासाहेबांच्या नावाची वास्तू तुटतेच कशी? असा प्रश्न विचारला. हा दोघांमधला फरक आहे. एकनाथ शिंदे हे सोन्याचा चमचा तोंडी घेऊन जन्माला आले नाहीत. काही जण बाप लिडर होता, म्हणून लिडर झाले आहेत. शिंदे हे भीम सैनिकांप्रमाणे संघर्षातून वर आले आहेत. त्यामुळे या युतीचा अभिमान आहे, असे सांगत ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.
जोगेंद्र कवाडे यांचे युतीत स्वागत :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोगेंद्र कवाडे यांचे युतीत स्वागत केले. "पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेची युती झाली आहे. आमचा संघर्ष साधा सोप्पा नव्हता. तुम्हा सर्वांना इतिहास माहित आहे. कवाडे यांनीही फार मोठा संघर्ष केला आहे. दोन्ही पक्ष लोकांना न्याय देण्यासाठी एकत्र आले आहेत, मात्र या आधीपासून माझे आणि कवाडे यांचे संबंध चांगले होते, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे, आता एक चांगली सुरूवात झाली असल्याचे शिंदेंनी म्हटले आहे. कवाडे यांनी केलेले ओबीसी आंदोलन हे देशव्यापी होते. त्यांनी लॉग मार्च काढले संघर्ष केला आणि ते आज इथेपर्यंत आले आहेत. यापुढे महाराष्ट्रसाठी आम्ही सोबत येऊन चांगले काम करू असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. इथे कोणी देण्याघेण्यासाठी आलेले नाहीत. तुम्ही असा अर्थ जोडू नका. ज्यांना आमच्या पक्षाचे विचार पटतील त्यांचे स्वागत आहे. लोकसभेत शिवसेना आणि भाजप युती क्लीन स्विप करेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.