मुंबई- अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांच्या पत्नींनी मुंबईला सहा वर्षांपूर्वी भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी मुंबईतील सर्वात परिचित असलेल्या अंजुमन-ए-इस्लाम या शैक्षणिक संस्थेला भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थिनींशी साधलेला संवाद आणि त्यांनी केलेले त्यावेळचे मार्गदर्शन याच्या आठवणी अंजुमन इस्लाममध्ये पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत.
अंजुमन-ए-इस्लामच्या शिक्षण संस्थेत जिल बायडन यांच्या आठवणी झाल्या ताज्या!
जो बायडन यांच्या पत्नींनी मुंबईला सहा वर्षांपूर्वी भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी मुंबईतील सर्वात परिचित असलेल्या अंजुमन-ए-इस्लाम या शैक्षणिक संस्थेला भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थिनींशी साधलेला संवाद आणि त्यांनी केलेले त्यावेळचे मार्गदर्शन याच्या आठवणी अंजुमन इस्लाममध्ये पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत.
मुली चार भाषेत बोलतात याचे अप्रुफ
यासंदर्भात अंजुमन-ए-इस्लामचे अध्यक्ष डॉ. जहीर काझी म्हणाले की, जिल बायडन या आमच्या शिक्षण संस्थेत विद्यार्थीनींसोबत बराच वेळ रमल्या. त्यावेळी केलेले मार्गदर्शन आजही विद्यार्थिनी आणि आमच्या लक्षात आहे. मुलींनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये, त्यांनी आपला आदर्श कायम निर्माण करावा, असा दिलेला संदेश आजही आम्हाला आठवतो असेही ते म्हणाले. आमच्या शाळेत मुली चार भाषेत बोलतात आणि त्या गरीब कुटुंबातील आहेत, हे लक्षात आल्याने त्यांच्यासोबत बायडन यांनी अनेक विषयांवर गप्पा मारल्या. अनेक मुलींशी त्यांनी चर्चा केली होती, अशी माहितीही काझी यांनी दिली.
चार भाषांमध्ये दिले जाते शिक्षण
अंजुमन-ए-इस्लामही अत्यंत जुनी आणि इंग्रजाच्या काळात स्थापन झालेली सर्वात मोठी शैक्षणिक संस्था आहे. मुंबईसह राज्यात अनेक शाखा आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चार भाषांमध्ये शिक्षण दिले जाते. अलीकडे या संस्थेत अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम आणि त्याचेही शिक्षण वाढलेले आहे.