महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अनुकंपा तत्वावरील नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांना मिळणार नोकरी किंवा 15 लाख रुपये -ऊर्जामंत्री - नोकरी

अनेक वर्ष हा निर्णय प्रलंबित असल्यामुळे प्रतिक्षा यादी मोठी होती. अनुकंपा तत्वावरील प्रलंबित असणाऱ्यांना 15 लाख रुपये देवून वन टाईम सेटलमेंट किंवा त्वरीत नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महावितरणमधील 1100 व महापारेषणमधील 222 इच्छूकांचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल.

ऊर्जामंत्री

By

Published : Sep 14, 2019, 3:06 AM IST

मुंबई- विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर सरकारी निर्णयांचा धडाका सुरु आहे. ऊर्जा विभागातील अनुकंपा तत्वावरील नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या इच्छूकांना नोकरी किंवा 15 लाख रुपये देण्याचा निर्णय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. हा निर्णय महावितरण व महापारेषण कंपनीच्या अधिकऱ्यांना दिला आहे. या दोन्ही कंपनीच्या एकत्रित झालेल्या बैठकीत डिसेंबर पर्यंत हा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले आहेत.

हेही वाचा-गणवेश आणि इतर शालेय साहित्यांसाठी विद्यार्थ्यांना 'तारीख पे तारीख'

अनेक वर्ष हा निर्णय प्रलंबित असल्यामुळे प्रतिक्षा यादी मोठी होती. अनुकंपा तत्वावरील प्रलंबित असणाऱ्यांना 15 लाख रुपये देवून वन टाईम सेटलमेंट किंवा त्वरीत नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महावितरणमधील 1100 व महापारेषणमधील 222 इच्छूकांचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल. या बैठकीत ऊर्जा विभागाचे अप्पर मुख्य सचिव अरविंद सिंह, मराविम कंप‍नीचे संचालक विश्वास पाठक, महावितरण चे संचालक (मानव संसाधन) पवनकुमार गंजू उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details