मुंबई Job Recruitment in Bombay High Court :मुंबई उच्च न्यायालयामध्ये डिसेंबर 2023 या काळात विविध पदांसाठी भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी स्टेनोग्राफर तसेच कनिष्ठ कारकून, शिपाई आणि हमाल इत्यादींचा समावेश आहे. यामध्ये उच्च न्यायालय आणि विविध जिल्हा न्यायालय यांच्यासाठीच्या या जागा जारी करण्यात आल्या आहेत. याबाबतची जाहिरात देखील मुंबई उच्च न्यायालयाने जारी केली आहे.
या दिवसापासून अर्ज प्रक्रिया सुरू : 4 डिसेंबर 2023 पासून या संदर्भात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणारा आहे. याबाबत शेवटची मुदत 18 डिसेंबर 2023 पर्यंत असणार आहे. यासंदर्भात स्टेनोग्राफर, कनिष्ठ कारकून, शिपाई आणि हमाल या पदांकरिता ही नोकर भरती होणार आहे. एकूण 4629 पदे भरले जाणार आहेत. यामध्ये कनिष्ठ कारकून यांची संख्या 2795 तर शिपाई यांची संख्या 1,266 इतकी असणार आहे. तर स्टेनोग्राफर यांची संख्या 568 असेल. यामधील काही मुंबई उच्च न्यायालयात तर काही राज्याच्या विविध जिल्हा न्यायालयांमध्ये भरती केली जाणार आहे.
परीक्षा होणार ऑनलाईन: न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. या संदर्भात चार डिसेंबर ते 18 डिसेंबरच्या आत संबंधित व्यक्तींनी अर्ज करणे आवश्यक आहे.
वयाची अट: या पदांसाठी जे व्यक्ती अर्ज करतील त्यांचं 18 वर्षे वय पूर्ण असावे तर 38 वर्षापर्यंत त्यांचं वय असले पाहिजे, अशी अट मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिसूचनेमध्ये घालण्यात आलेली आहे.