मुंबई - आज दीड दिवसांच्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. यासाठी पालिकेच्या पश्चिम विभागाकडून जुहू समुद्र किनारी विसर्जनासाठी तयारी करण्यात आली आहे. सकाळपासून 5 घरगुती गणेशमूर्तींचे जुहू समुद्रकिनारी विसर्जन करण्यात आले.
अभिनेते जितेंद्र यांच्या घरच्या गणपतीचे जुहू समुद्रकिनारी विसर्जन
ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर यांच्या घरगुती बाप्पालाही आज जुहू समुद्र किनारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. पालिकेने नेमलेल्या स्वयंसेवकानी जितेंद्र यांच्या बाप्पाचे समुद्रात विसर्जन केले.
ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर यांच्या घरगुती बाप्पालाही आज जुहू समुद्र किनारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. पालिकेने नेमलेल्या स्वयंसेवकानी जितेंद्र यांच्या बाप्पाचे समुद्रात विसर्जन केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने जागोजागी कृत्रिम तलाव उभारले आहेत. तरीही भक्तगण दरवर्षीप्रमाणे समुद्रकिनारी येतील, यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. समुद्राला भरती असल्याने व कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पालिकेने श्रींच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी स्वयंसेवक तैनात ठेवले आहेत. भाविकांनी स्वयंसेवकांकडे श्रींची मूर्ती घेऊन बाप्पाला निरोप द्यायचा, असा नियम पालिकेने केला आहे. पोलीस, रुग्णवाहिका व लाईफ गार्ड, पालिका कर्मचारी जुहू समुद्रकिनारी सुरक्षेच्या दृष्टीने तैनात आहेत.