मुंबई : जितेंंद्र आव्हाड यांच्यासाठी आता पत्नी ऋता सामंत पुढे आल्या ( Jitendra Awhad Wife Ruta Samant ) आहेत. त्यांनी ट्विटवर त्यांचे मत व्यक्त केले. ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत रीदा रशिद यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत. NCP व जितेंद्र आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या आहेत. अंगावर धडकणाऱ्या व्यक्तिला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेन मध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील. ह्या राजकारणी महत्वाकांक्षा बाळगतात. काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. जे काही घडले ती स्पोन्टेनिअस रिऐक्शन होती. त्याला विनयभंग म्हणता येत नाही. असे ऋता सामंत ( Ruta Samant Reaction ) यांनी म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढल्या : महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल झाला ( Woman Register Molestation Case On Jitendra Awhad ) आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 354 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली ( Case Registered At Mumbra Police Station ) आहे.