मुंबई- धारावीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. धारावीसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये कोणत्याही दर्जाच्या आरोग्य व्यवस्था नसल्याने येथे उपचार यंत्रणाही कोलमडून पडली आहे. एकुणच कोरोनामुळे मुंबईची अर्थव्यवस्थाही घसरलेली असून अशा स्थितीमध्ये धारावीच्या पुनर्विकासाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून केली आहे.
कोरोनाचे हॉटस्पॉट झालेल्या धारावीचा पुरर्विकास करा, जितेंद्र आव्हाड यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - जितेंद्र आव्हाड कोरोना
या पत्रात आव्हाड यांनी धारावीसारख्या सर्व जातीधर्माच्या वस्तीच्या भागाचा विकास केल्यास तो महाविकास आघाडी सरकारसाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या हिताचा ठरणार असल्याचे म्हटले आहे.
या पत्रात आव्हाड यांनी धारावीसारख्या सर्व जातीधर्माच्या वस्तीच्या भागाचा विकास केल्यास तो महाविकास आघाडी सरकारसाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या हिताचा ठरणार असल्याचे म्हटले आहे. तसेच यासाठीची संपूर्ण प्रक्रिया झाली असून आपल्या आपल्या स्तरावर एक बैठक आयोजित करून धारावी पूनर्विकास प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. मुंबईची कोविड कॅपिटल म्हणून धारावीची ओळख प्रस्थापित होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये धारावीबदृल नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे धारावीच्या पुनर्विकासाएवढी सुंदर समाजिक आर्थिक संधी महाविकास आघाडीला मिळणार असल्याचेही आव्हाड यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
धारावीच्या विकासाची घोषणा ही मागील सरकारच्या काळात करण्यात आली होती. केंद्रापासून राज्यापर्यंतच्या सर्व प्रक्रिया पार पडल्या आहेत. आजच्या स्थितीमध्ये कोरोनामुळे मुंबईचे अर्थकारण घसरलेले आहे. अशा स्थितीत धारावीच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला तर राजकीय विरोधकांनाही सामाजिक दणका आपल्याला देणे शक्य होणार आहे, बांधकाम उद्योग यामध्ये कितीही घसरण झाली तर बाहेरच्या विश्वातून निधी येतो, त्यामुळे ढासाळलेल्या आर्थिक सामाजिक स्तर उंचावतानाच नवीन रोजगार निर्मितीदेखील करता येईल असे काही पर्यायही आव्हाड यांनी सूचवले आहेत.