मुंबई - देशभरात कोरोनाने थैमान घातले असतानाच, भारतातही कोरोना पाय पसरु लागला आहे. या पार्श्वभूमीवर नजीकच्या काळात होणारी नवी मुंबई महापालिकेची निवडणूक ६ महिने पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून विनंती केली.
नवी मुंबई पालिकेची निवडणूक ६ महिने पुढे ढकलावी, आव्हाडांचे निवडणूक आयुक्तांना पत्र - कोरोना न्यूज
नजीकच्या काळात होणारी नवी मुंबई महापालिकेची निवडणूक ६ महिने पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून विनंती केली.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही शहरांमध्ये गर्दीची ठिकाणे तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नजीकच्या काळात नवी मुंबई पालिकेची निवडणुकही होत आहे. निवडणुकीच्या वेळी मोठ्या प्रमाणात नागरीक एकमेकांच्या संपर्कात येतील. त्यामुळे ही निवडणूक ६ महिने पुढे ढकलण्याची मागणी आव्हाड यांनी केली. तसेच राज्यातील इतरही निवडणुका पुढे ढकलण्यात याव्या अशी मागणी आव्हाड यांनी केली.