मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दिल्लीतील बैठक बेकायदेशीर असल्याचा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला. कोणते निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचा आरोप अजित पवार गटाने केला आहे. यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आजची पत्रकार परिषद गोंधळलेल्या अवस्थेत झाली असल्याचा टोला प्रफुल्ल पटेल यांना लगावला. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना काहीच अधिकार नाही तर तुम्ही कशा नेमणुका केल्या. त्यांना अधिकार नाही तर तुम्हाला देखील नाही. न्यायाधीश धनंजय चंद्रचुड म्हणतात की, 10 वे शेड्युल हे फेरफार थांबविण्यासाठी आहे. पक्षांतर्गत कायदा हा फेरफार रोखण्यासाठी करण्यात आला होता. आमदारांनी पक्षासोबत बंडाळी करू नये त्यामागचा उद्देश असावा. तुम्हाला नेमणूक करण्याचा अधिकार कोणी दिला? कोणत्या अधिकाराने तुम्ही म्हणतात की, शरद पवारांना कोणताही अधिकार नाही.
पक्षांतर निवडणुक झाला नसल्याचा आरोप : पक्षांतर्गत निवडणुका झालेल्या नसल्याचा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. याला उत्तर देताना आव्हाड म्हणाले की, मात्र त्याच कालावधीत तुम्ही जिंकून येऊन पदावरती बसला. तुम्हाला आमदार मंत्रीपद कोणामुळे मिळाले तर त्याचे उत्तर शरद पवारांमुळे. त्याच पवार यांना तुम्ही संविधान कळत नसल्याचा आरोप करत आहात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संविधान चुकीचे आहे हे कधी म्हणता तर, सगळे मिळून झाल्यानंतर. माझी लढाई संविधानासाठी आहे कोणी वैयक्तिक घेऊ नये असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.