मुंबई :जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता (Jitendra Awhad problems increasing possibility) आहे. ठाण्यातील तरुण अनंत करमुसे (Anant Karmuse Beating Case) या तरुणाला २०२० साली मारहाण केल्याच्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी आता अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. कारण या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे देण्यात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्याचा माणस तरुणाने व्यक्त केला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट (Jitendra Awhad Twitt Anant Karmuse Case) करून आपण या विरोधात लढणार असल्याचा निर्धार केला आहे. मात्र तासात आपल्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र या गुन्ह्यामध्ये काहीही सापडलं नाही त्यामुळे आपल्यावर तिसरा गुन्हा दाखल केला जातोय. Latest news from Mumbai, Mumbai Crime
- तपास सीबीआयकडे द्यावा, याचिका हायकोर्टात - ज्या तरुणाला मारहाणीच्या प्रकरणात पोलिसांनी तपास करून कोर्टात चार्जशीट देखील दाखल केली होती. मात्र हा संपूर्ण तपास सीबीआयकडे द्यावा यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात हा सर्व तपास सीबीआयने करावा यासाठीची याचिका करण्यात आली आहे. याचिकेमुळे पोलिसांवर तीच विश्वास नाही का असा सवाल ही आपल्या ट्विटच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.