जितेंद्र आव्हाडांनी केली पवारांची नक्कल मुंबईJitendra Awhad On Ajit Pawar :राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शरद पवारांचे समर्थकआमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांची नक्कल केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्वभाव आवडत नसल्यानं मी दूर राहतो, असं देखील त्यांनी म्हटलंय. सत्तेत असो वा नसो, उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच आपल्या खास शैलीनं चर्चेत असतात. अजित पवार नेहमीच आपल्या शैलीत मंत्री, आमदार, नेते, कार्यकर्ते, अधिकाऱ्यांना कानपिचक्या देत असतात. कधी कधी पत्रकार परिषदेतही अजित पवार वेगळ्याच शैलीत बोलत असतात. एका पत्रकार परिषदेत कार्यकर्त्यांना तू गप रे, बस खाली अशी भाषा वापरली होती, यावर जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांच्या शैलीवर प्रश्न उपस्थित केलाय.
स्वभाव आवडत नाही :राष्ट्रवादीचेखासदार अमोल कोल्हे यांना अजित पवार यांनी त्यांच्या मतदारसंघात आव्हान दिलंय. यावर आव्हाड म्हणाले की, ते कोणालाही पाडू शकता. 48 पैकी 48 जागा निवडून आणू शकतात. अजित पवार जनतेवर कसा दबाव टाकतात, हे सर्वांनीच पाहिलं आहे. ती मोठी माणसं आहेत, ते काहीही करू शकतात, असं आव्हाड म्हणाले.
दबाव टाकण्याचा प्रकार :केंद्रीय निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, चिन्हाची सुनावणी पूर्ण झाली आहे. याबाबत आव्हाड म्हणाले की, अजित पवार गटाकडून आपल्याला पक्ष-चिन्ह मिळेल, असा वारंवार केलेला दावा म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगावर दबाव आणण्याचा प्रकार आहे. त्यांनी याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडं तक्रार केल्याचं सांगितलं. अजित पवार यांच्या गटाला भविष्यात भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल, असा दावाही त्यांनी केला. शालिनीताई पाटील अजित पवार यांच्याबद्दल काय म्हणतात, हे मला माहीत नाही. मी त्यावर भाष्य करणार नाही. वंचित बहुजन आघाडीचे इंडिया आघाडीत समावेश करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याबाबत प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांना देण्यात आल्याचं आव्हाड यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- 146 खासदारांच्या निलंबनाविरोधात ठाण्यात निदर्शनं
- अभिनेत्री रिया चक्रवर्तीला दिलासा, लुकआउट नोटीस तात्पुरती स्थगित
- मराठा आरक्षणानंतर मुस्लिम, धनगर आरक्षणासाठी लढणार - जरांगे