मुंबई - भारतात सुरू झालेल्या स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यान हिंदू महासभा आणि मुस्लीम लीग या दोन्ही संघटना ब्रिटिशांचे चमचे म्हणून काम करत होत्या, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका ट्विटच्या माध्यमातून केला आहे.
हेही वाचा -'कर्जमाफी ही अकबराच्या न शिजणाऱ्या बिर्याणीसारखी'
देशभरात नागरीकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरातील शेकडो संघटना रस्त्यावर उतरलेल्या असतानाच हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग या संघटनेने मात्र या कायद्याच्या समर्थनात आपले कार्यक्रम सुरू केले आहेत. आज दादर येथे सकाळी दहा वाजता हिंदू महासभेने चौक सभेचे आयोजन केले असून त्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी हिंदू महासभा आणि मुस्लीम लीग या या दोन्ही संघटनांवर जोरदार टीका केली आहे.